सेट. रॉबेन पब्लिक स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
आपल्या देशाला लिखित संविधान देऊन भारतातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिले त्यामुळे
त्यांच्या विचारांचा अनुकरण करून आत्मसात करणे गरजेचे आहे
![]() |
महापुरुषांची वेशभूषेत सेट. रॉबेनचे चिमुकले विद्यार्थी |
नागपूर : आपल्या देशाला लिखित संविधान देऊन भारतातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिले त्यामुळे त्यांच्या विचारांचा अनुकरण करून आत्मसात करणे गरजेचे आहे असे आनंद खापर्डे यांनी सांगितले ते जरीपटका येथील सेट रॉबेन पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज व न्यू चैतन्य स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते आनंद खापर्डे, अनिल चौहान, मुख्याध्यापिका धनश्री बरसागडे, कोमल सोनकांबळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून कविता, भाषण, देशभक्ती गीत , नाट्य सादर करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैशाली सिडाम, सरोज फ्रांसिना, फ्रांसिना फ्रांन्सिस,रानु मेश्राम, रेखा रुईकर, हिलु हिरणखेडे, रुचा खोब्रागडे, , रिया डोईफोडे, नेहा फुलझेले, स्वप्निता वालदे, जुही खोब्रागडे, परिमल रामटेके, कोमल बाहेकर, गौरव दातिर, प्रेरणा हिरेखन, योगेश भगत, निनाद वंजारी, ललित धार्मिक, शितल नंदेश्वर, भाग्यश्री माने,वर्षा रहांगडाले, विशाल ठाकरे, पिंटू राउत, शितल पराते, नम्रता शेवतकर, प्रमिला टेंभुर्णे, ज्योती अंबादे, यांनी परिश्रम केले.सूत्रसंचालन हरमितकौर विरदी यांनी केले. आभार अभिज्ञा बागडे यांनी मानले.
No comments