Breaking News

विद्यार्थ्यांनो व्हर्चुअल पेक्षा रिअल मित्र बनवा : अरुणकुमार क्षीरसागर

 'सायबर सुरक्षा' विषयावर कार्यशाळेचे आयोजन 


नागपूर,ता.३० : युवक व युवतींना व्हर्चुअल मित्र बनविण्या पेक्षा रिअल मित्र बनवण्यावर भर दिला पाहिजे असे जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अरुणकुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ते तथागत चौक, पोलीस चौकी येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था व सॉफ्टपॉईंट कॉम्पुटर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी सायबर सुरक्षा या विषयावर आयोजित  कार्यशाळेत बोलत होते.   क्षीरसागर  यांनी सायबर गुन्हेगार कसे वेगवेगळ्या पद्धती वापरून बेरोजगार युवकांना तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींना आपले लक्ष्य करतात हे सांगितले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक  जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुणकुमार क्षीरसागर, संस्थेचे  अध्यक्ष राहुल वासनिक, एमकेसीएलच्या प्रतिनिधी समीक्षा  चांदुरकर, पल्लवी बारस्कर उपस्थित होत्या. समीक्षा  चांदुरकर व पल्लवी बारस्कर  यांनी फेसबुक, व्हाट्सअप किंवा कुठलीही ऑनलाईन अप्स  वापरतांना काय खबरदारी घ्यायला पाहिजे हि माहिती दिली. सॉफ्टपॉईंट कॉम्पुटर इन्स्टिटयूटचे संचालक  राहुल वासनिक यांनी कसे युवकांना रोजगाराचे आमिष देऊन तसेच कंपनीचे हुबेहूब  बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक केल्या जाते हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी लोखंडे यांनी केले.

Students, make real friends rather than virtual ones: Arun Kumar Kshirsagar

Organized workshop on 'Cyber ​​Security'

Nagpur, 30th: Senior Inspector of Jaripatka Police Station Arun Kumar Kshirsagar told the students that rather than making virtual friends, emphasis should be placed on making real friends. He was speaking at a workshop on cyber security for youth organized in association with Gyanodaya Multi-Purpose Institute and Softpoint Computer Institute at Tathagata Chowk, Police Chowki. Kshirsagar explained how cybercriminals use different methods to target unemployed youth as well as celebrities.
Chief Guide Jaripatka Police Station Senior Police Inspector Arun Kumar Kshirsagar, President of the organization Rahul Wasnik, MKCL representative Samika Chandurkar, Pallavi Barskar were present. Samiksha Chandurkar and Pallavi Barskar gave information about what precautions should be taken while using Facebook, WhatsApp or any online apps. Rahul Wasnik, director of Softpoint Computer Institute, told how youths are cheated by being lured with employment and by creating completely fake websites of the company. The program was moderated by Pallavi Lokhande.

No comments