N7 News Voice : परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यासाठी २७ मार्चला शिक्षकांचे आंदोलन
|
राज्यातील सर्व जिल्हात विशेषत; विदर्भातील एप्रिल महिन्यातील तापमान ४४ ते ४५ डिग्री एवढे उच्च राहत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यासाठी २७ मार्चला शिक्षकांचे आंदोलन
एप्रिल महिन्यात ४४ ते ४५ डिग्री तापमान..
नागपूर,ता.२३ : इयत्ता १ ते ९ वी वर्गाच्या परीक्षा घेण्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी २७ फेब्रुवारी ला काढलेले पत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाचे २७ मार्चला आंदोलन करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्हात विशेषत; विदर्भातील एप्रिल महिन्यातील तापमान ४४ ते ४५ डिग्री एवढे उच्च राहत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच परीक्षेच्या काही विषयाच्या प्रश्नपत्रिका शासन स्तरावरून तर काही विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार कराव्या लागणार आहे. त्यामुळे कठिन्यपातळी व दर्ज्याबाबत एकवाक्यता राहणार नाही. यापूर्वी जेव्हा जेव्हा शासन स्तरावरून परीक्षा घेण्यात आल्या त्या प्रतेक वेळी नियोजन व अमलबजावनीमध्ये अनेक त्रुट्या झाल्यामुळे परीक्षा घेण्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
शालेय कामकाज, अभ्यासक्रम नियोजन, संपूर्ण वर्षभरातील परीक्षांचे नियोजन व मूल्यमापन करून निकाल घोषित करणे हे सर्व अधिकार शाळा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याचे येनवेळी वेळापत्रक जरी करून शासनाने मुख्यध्यापकांच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सदर परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाने २७ मार्चला शिक्षण उपसंचाक नागपूर यांचे कार्यालयासमोर आंदोलन आयोजित केल्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे मार्फत शासनाला दिलेले आहे. यावेळी संघटनेचे राज्य सचिव बाळा आगलावे, यशवंत जनबंधू, प्रवीण रेवतकर, जयघोष वालदेकर, गणेश झाडे, जयप्रकाश तवले, सोमकुवर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
In all districts of the state; Especially in Vidarbha, the temperature in the month of April remains as high as 44 to 45 degrees, which is likely to affect the health of students and teachers.
Teachers' agitation on March 27 to cancel the exam schedule
Temperature of 44 to 45 degrees in the month of April..
Nagpur, 23: Maharashtra Secondary Teachers' Federation will protest on March 27 to demand the cancellation of the letter issued by the State Council of Educational Research and Training Pune on February 27 regarding the conduct of examinations for classes 1 to 9. In all districts of the state; Especially in Vidarbha, the temperature in the month of April remains as high as 44 to 45 degrees, which is likely to affect the health of students and teachers.
Also, the question papers of some subjects of the exam will have to be prepared by the government level and the question papers of some subjects at the school level. Due to this, there will be no uniformity regarding the difficulty level and standard. Whenever the exams were conducted at the government level earlier, there were many errors in planning and implementation, which created confusion in conducting the exams.
The principal, as the head of the school, has all the rights to plan school activities, curriculum, plan and evaluate examinations throughout the year and declare the results. Therefore, the government has violated the rights of the principal by issuing a schedule for conducting examinations at the wrong time. Therefore, the Maharashtra Secondary Teachers' Federation has submitted a statement to the government through the Deputy Director of Education, Nagpur, that it has organized a protest in front of the office of the Deputy Director of Education, Nagpur on March 27, demanding the cancellation of the said circular. On this occasion, the state secretary of the organization, Bala Agalave, Yashwant Janabandhu, Praveen Revatkar, Jaighosh Waldekar, Ganesh Zade, Jayaprakash Tavale, Somkuvar and other office bearers were present.
No comments