Breaking News

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत व्यवसायिक शिक्षणावर भर द्या : डॉ. मिलिंद माने

   

विद्यार्थ्यांना बक्षीस देताना डॉ.मिलिंद माने व संस्थेचे पदाधिकारी

नागपूर : भारतीय संविधानाचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले.  स्त्रियांना  कुठलेही अधिकार नव्हते  आज  मात्र संविधानिक अधिकारामुळे स्त्रिया डॉक्टर, पोलीस, कलेक्टर, हवाई पायलट अश्या उंच पदापर्यंत पोहचल्या त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या   विचाराचे आत्मसात करून  आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासा  सोबत  व्यवसायिक शिक्षणावर भर द्यायला पाहिजे  असे  उद्गार उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी काढले ते श्रीमती जाईबाई हिंदी  इंग्लिश शाळेत  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.     

समता नगर येथील महाकारुणिक  तथागत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती जाईबाई हिंदी व  इंग्लिश प्राथमिक शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उत्तर नागपुरचे माजी आमदार डॉ. मिलींद माने यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  कार्यक्रमास माजी आमदार डॉ.मिलींद माने, डॉ. सरीता माने,  ज्येष्ठ शिक्षक  वामनराव साखरे  संस्थेचे अध्यक्ष  प्रविण मानवटकर, संस्थेचे सचिव  मोरेश जांभुळकर,   हेमा जांभुळकर,   शाळेच्या मुख्याध्यापिका  जयश्री सोनूले,  निलीमा बोरकर  उपस्थित होत्या.
     यावेळी  विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे  वेशभूषा परिधान करून  नृत्यू देशभक्तीवर नृत्य सादर केले.  विज्ञान प्रदर्शनीतील विद्यार्थ्यांना डॉ. मिलिंद माने  यांच्या हस्ते  बक्षीस वितरण करण्यात आले.  विद्यर्थ्यांना व पालकांना  मिठाई  वाटप करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिकवृंद यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिना कावळे यांनी केले. आभार  लिकेश  बादूले  यांनी मानले. 

Students should focus on vocational education along with studies: Dr. Milind Mane
Principal Jayashree Sonule while felicitating Dr. Sarita Mane

Nagpur: Architect of Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar gave the citizens their basic rights. Women did not have any rights, but today, due to the constitutional rights, women have reached high positions like doctors, police, collectors, air pilots, so  Exclaiming the thoughts of Dr.Babasaheb Ambedkar, in today's age of competition, students should emphasize on vocational education along with studies. Illustrated by Milind Mane Mrs. Jaibai was speaking at the Republic Day program at Hindi English School.

74th Republic Day was celebrated jointly by Smt. Jaibai Hindi and English Primary School run by Mahakaruni Tathagata Shikshan Sanstha at Samta Nagar. Former North Nagpur MLA Dr. Milind hoisted the flag. Chief guest of the program former MLA Dr. Milind Mane, Dr. Sarita Mane, Senior Teacher Vamanrao Sakhre Institute President Pravin Manavatkar, Institute Secretary Moresh Jambhulkar, Hema Jambhulkar, School Principal Jayashree Sonule, Nilima Borkar were present.
      On this occasion, the students dressed up in the costumes of great men and performed dances on Nrithu Patriotism. Science exhibition students  Prize was distributed by Dr.Milind Mane. Sweets were distributed to students and parents. The students of the school worked hard to make the program successful. The program was moderated by Rina Kawle. Thanks Likesh Badule.


No comments