Breaking News

नागपुरात विविध शैक्षणिक संस्थांकडून प्रजासत्ताक दिन साजरा

 नागपुरातील  हंसकृपा पब्लिक स्कुल, जीवनरक्षा मतिमंद विद्यालय, अंजुमन हायस्कुल  व ज्यु. कॉलेज, बोधी ट्री किंडरगार्टनमध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. 

हंसकृपा पब्लिक स्कुल कोराडी रोड नागपूर 

नागपूर, ता. २७ :  कोरडी रोड येथील ग्रामीण महिला बहुउद्देशीय मागास वर्गीय संस्थेअंतर्गत संचालीत हंसकृपा पब्लिक स्कुल येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  आदिवासी संघटनचे गोरखनाथ  सोलंकी, सावकर ज्वेलर्सचे  संचालक रामभाऊ साभांरे, संस्थेचे संचालक दुर्गादास जिचकार, संचालिका, निलीमा जिचकार, मुख्याध्यापिका रुपाली जवंजाळ, गिता भटटाचार्य, स्वप्नील  पातोडे, मारोती जुनघरे,निवृत्त पोलीस  निरक्षक चरणदास टापरे, बाबाराव चव्हान, नेहा फटींग,एम.जी.गांगुली, स्टेट बँक व्यवस्थापक  सुधीर माटे, रवी  चवघोले उपस्थित होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत सादर केले. 'रोड सुरक्षा सप्ताह जागृता' बद्दल  सुरक्षेचे महत्व  शाळेचे संचालक जिचकार यांनी  विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  
यावेळी  कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक रंजना घायवट,मेघा राऊत, विजय नायडु, सारिका बनकर,निखील बिरहा ,कुणाल जिचकार, अॅनीमेषनचे संचालक अक्षय जिचकार व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उज्वला शेंडे यांनी केले. आभार सोनाली लाडसे यांनी मानले. 

जीवनरक्षा मतिमंद विद्यालयात ध्वजरोहण करून तिरंग्याला सलामी देतांना शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी 








जीवनरक्षा मतिमंद विद्यालय कामगार चौक, कामठी रोड    
नागपूर,ता.२७ : जरीपटका रिंग रोड कामगारनगर चौक येथील  एकता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचलित  जीवनरक्षा मतिमंद निवासी विद्यालयात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले. 
यावेळी कायक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष  समरूपं समिती नागपूरचे मधु सिंघी, संस्था संस्थापक किसनजी चहांदे, मुख्यधापक  राजेश सुहाम, मुख्यध्यापिका  प्रतिभा उंदिरवाडे, संचालिका अल्का चहांदे  उपस्थित होते.  मान्यवरांच्याहस्ते  महापुरुषांच्या  प्रतिमेला  माल्यापर्ण व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   वस्तीगृह अधिक्षक लीलाधर तागडे यांनी देशभक्तीचे गीत प्रस्तूत केले,
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन क्रीडाप्रमुख गीता रायकवार आणि  छाया कापुरे यांनी केले.  कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक  पिंटेश महंत, अचला चौधरी, वर्षा केवट, परिचारिका लिला ठाकरे, डॉ. कविता बन्सोड , शंकर चव्हाण, नितिन मस्के, मंगलचंद  शुक्ला, हेमलता गजभिये, राजश्री जुमळे, संतोष बोरकर, मनवर चव्हाण उपस्थित होते. 
 

बोधी ट्री किंडरगार्टन, न्यू जरीपटका नागपूर 

बोधी ट्री किंडरगार्टनमध्ये प्रजासत्ताक दिन

 नागपूर,ता.२८ : न्यू जरीपटका नारा रोड अशोकानगर, दरवाडे ले आउट येथील बोधी ट्री किंडरगार्टन येथे ७१ व्या प्रजासत्ताक  दिन साजरा करण्यात आला .
  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेविका एन७ न्यूज व्हॉइसच्या सहसंपादक कोमल राऊत, बोधी ट्री किंडरगार्टनचे संस्थापक  विलास राऊत, मुख्याधापिका प्रीती राऊत, युवा क्रांती सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल गोंडाणे , निलेश गायकवाड पत्रकार निलेश राऊत,  उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रगती राऊत यांनी केले. विपिलेश राऊत यांनी आभार मानले.यावेळी पालक, शिक्षवृंद व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. 



      
Attachments area

No comments