नागपुरात तिरंगा जनजागृती अभियानाला युवकांचा पुढाकार
राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान
एन७ न्यूज व्हॉईस :
नागपूर, ता. २९ : नाग स्वराज फाऊंडेशन आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान मंगळवारी उत्साहात पार पडले.
नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा वर्षा २०१० पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.
नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले,जीर्ण झालेल्या कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते. २६ जानेवारी व १५ ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात व जीर्ण,फाटलेले,कुजलेले (तिरंगा)ध्वज कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीने २६ व २७ जानेवारी या दिवशी ९० च्या वर कागदी व प्लॉस्टिकचे राष्ट्रीय ध्वज जमा केले.
२३ ते २६ जानेवारी २०२१ या कालावधीत जनजागृती अभियान झाले. या अभियानाच्या दरम्यान शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले.
या अभियानात नाग स्वराज फाऊंडेशनचे सचिव हितेश डोर्लीकर, पोर्णिमा वऱ्हाडे, हर्षल हरणे, सौ.हर्षा डोर्लीकर, प्रतीक्षा खोटपाल, प्रो.डॉ. विनायक साखरकर, रुपेश रेघे, यज्ञेश कपले, दिव्या राहाटे, हेमंत पराते या युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आपल्याला
‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान कसा वाटला या विषयी आपले प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, आवडला असेल तर लाईक आणि शेर करण्याला विसरू नका... जय हिंद
Public Awareness Campaign in Nagpur in Honor of National Flag
N7 News Voice:
Nagpur, Tal. 29: Nag Swaraj Foundation and Kamyab Foundation and Har Din Honge Kamyab jointly organized 'Kara Samman Tirangyacha' public awareness campaign on Tuesday in honor of the national flag. . The organization is working to raise paper and plastic flags (tricolors) through these campaigns. Lifting fallen, torn, rotten, worn out paper and plastic flags (tricolors) in parks, schools, colleges, government offices and public places in Nagpur city. On 26th January and 15th August, children and youths enthusiastically carry the national flag 'Tricolor' and throw old, torn, rotten (tricolor) flags everywhere, which is an insult to the national flag. To prevent this from happening, the activists of Nag Swaraj Foundation, with the help of the people, hoisted the national paper and plastic flag on January 26 and 27.
Awareness campaigns were conducted from 23rd to 26th January 2021. During the campaign, stickers and posters were distributed in schools and colleges to create awareness among the citizens.
Secretary of Nag Swaraj Foundation Hitesh Dorlikar, Pournima Varhade, Hershal Harne, Mrs. Harsha Dorlikar, Pratiksha Khotpal, Prof.Dr. Vinayak Sakharkar, Rupesh Reghe, Yagnesh Kapale, Divya Rahate, Hemant Parate were the young activists who participated.
Don't forget to leave your feedback on how you felt about 'Kara Samman Triangya', if you like it, don't forget to like and share ... Jai Hind
Great work hitesh sir nd ur team
ReplyDeleteGreat Job Done by Kamyab Foundation.
ReplyDeleteGood job & proud all of you.🙏
ReplyDelete