Breaking News

यूपीएससी’ नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम

यूपीएससी’ नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम

अनुज अग्निहोत्री

एन७ न्यूज वॉइस  

दिल्ली : देशातील  सर्वात कठीण परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ अंतिम निकाल जाहीर केला आहे. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे.

अनुज अग्निहोत्री देशात प्रथम निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच केंद्र सरकारच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ सेवांमध्ये केली जाणार आहे. या वर्षीच्या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजेश्वरी सुवे एम, तिसऱ्या क्रमांकावर आकांश धुल्ल, चौथ्या क्रमांकावर राघव झुनझुनवाला आणि पाचव्या क्रमांकावर ईशान भटनागर यांनी स्थान मिळवले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३१७ सामान्य प्रवर्गातील, १०४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), ३०६ इतर मागासवर्गीय (OBC), १५८ अनुसूचित जाती (SC) आणि ७३ अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.  


UPSC Civil Services Exam Result Announced; Anuj Agnihotri First in the Country
N7 News Voice
Delhi: The Union Public Service Commission has announced the final results of the Civil Services Exam 2025. The written exam was conducted in August 2025, while the interviews were held between December 2025 and February 2026. Based on these two stages, the Commission has recommended a total of 958 candidates for various central services.
Anuj Agnihotri The first selected candidates in the country will be appointed in the Indian Administrative Service (IAS), Indian Foreign Service (IFS), Indian Police Service (IPS) as well as Central Government Group 'A' and 'B' services. Anuj Agnihotri has secured first rank in the country in this year's exam. Rajeshwari Suve M has secured second place, Akansh Dhull has secured third place, Raghav Jhunjhunwala has secured fourth place and Ishan Bhatnagar has secured fifth place. According to the information provided by the commission, the candidates selected this year include 317 candidates from the general category, 104 from the economically weaker section (EWS), 306 from the other backward classes (OBC), 158 from the scheduled castes (SC) and 73 from the scheduled tribes (ST) categories.

No comments