Breaking News

नागलोकमध्ये 'तणावमुक्तीचा मार्ग' धम्मशिबिराचा समारोप : N7 News Voice

 

नागलोकमध्ये 'तणावमुक्तीचा मार्ग' धम्मशिबिराचा  समारोप

www.n7newsvoice.in
त्रिरत्न बौद्ध महासंघ नागलोकचा उपक्रम ; १५० उपासक-उपसिकांचा सहभाग

एन७ न्यूज व्हॉईस 
नागपूर,ता.६: धावपळीच्या जीवनात मानवी मनाला शांती आणि तणावातून मुक्ती मिळावी, या उद्देशाने त्रिरत्न बौद्ध महासंघ नागलोक, नागपूर तर्फे आयोजित सहा दिवसीय विशेष ध्यान व धम्मशिबिराचा नुकताच उत्साहात समारोप झाला. १ मार्च ते ६ मार्च या कालावधीत कामठी रोडवरील नागलोक केंद्रात हे शिबीर पार पडले.
 या शिबिराचे मुख्य नेतृत्व पुण्यातील धम्मचारी आदित्यबोधी यांनी केले. 'तणाव से मुक्ती का रस्ता' या मुख्य विषयावर त्यांनी सहा दिवस सखोल मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी बुद्ध धम्माचा दृष्टिकोन आणि ध्यानाचे महत्त्व त्यांनी आपल्या प्रवचनातून पटवून दिले. पंचशीलाचे आचरण करून जीवन सुखी आणि तणावमुक्त कसे करावे, यावर त्यांनी विशेष भर दिला. 
सहा दिवसांच्या या शिबिरात ध्यानसाधना व योग, धम्मरत्न व   त्रिरत्नांच्या महत्त्वाबद्दल  धम्मचारी सुविर्य यांनी बुद्धरत्न, धम्मचारिनी सम्यका यांनी धम्मरत्न, धम्मचारी प्रसन्न बोधी यांनी संघरत्न या विषयावर  मार्गदर्शन केले तसेच डॉ. राजेंद्र नांदेडकर यांनी 'हार्मोन्स' आणि त्यांचा मानवी स्वभावावर होणारा परिणाम यावर शास्त्रीय व रंजक मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान प्रश्नोत्तर सराव, संपर्क आणि धम्मवर्गाच्या माध्यमातून साधकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बुद्ध, धम्म आणि संघाच्या शिकवणीतून तणावमुक्त समाज घडवण्याचा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. शिबिरार्थींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या शिबिरात एकूण १५० शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला.  शिबिराच्या यशस्वीतेकरिता १० धम्मचारी आणि ४ धम्मचारिनींनी विशेष परिश्रम घेतले.


'Path to Freedom from Stress' Dhamma Camp concludes in Naglok

Triratna Buddhist Federation Naglok initiative; 150 seekers participate

N7 News Voice 
Nagpur, Date 6: With the aim of ensuring peace and freedom from stress in the hectic life of the human mind, a six-day special meditation and Dhamma camp organized by Triratna Buddhist Federation Naglok, Nagpur recently concluded with enthusiasm. This camp was held at Naglok Center on Kamathi Road from March 1 to March 6. This camp was led by Adityabodhi, a Dhammachari from Pune.

He guided in-depth for six days on the main topic 'Path to Freedom from Stress'. He explained the importance of Buddhist Dhamma and meditation in removing stress from daily life through his discourse. He laid special emphasis on how to make life happy and stress-free by practicing the Panchasila. In this six-day camp, Dhammachari Suvirya guided on the importance of meditation and yoga, Dhammaratna and Triratna, Dhammacharini Samyaka guided on the topic of Dhammaratna, Dhammacharini Prasanna Bodhi guided on the topic of Sangharatna, and Dr. Rajendra Nandedkar provided scientific and interesting guidance on 'hormones' and their impact on human nature. During the camp, the doubts of the seekers were cleared through question and answer practice, contact and Dhammavarga. The message of creating a stress-free society through the teachings of Buddha, Dhamma and Sangha was given through this camp. The campers have expressed satisfaction with this initiative. A total of 150 campers participated in this camp. 10 Dhammacharis and 4 Dhammacharinis worked hard for the success of the camp.


No comments