Breaking News

राष्ट्र सेवा विद्यालयात कचऱ्यातून कलाकृती साकारत दिला 'थ्री-आर'चा संदेश :N7 News Voice

राष्ट्र सेवा विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात; 

कचऱ्यातून कलाकृती साकारत दिला 'थ्री-आर'चा संदेश 

 विद्यार्थिनीला सायकल भेट देतांना  मान्यवर 

नागपूर,ता.२ : पद्मानगर येथील राष्ट्र सेवा विद्यालय येथे क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यासोबतच आपल्या कल्पकतेचेही दर्शन घडवले. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रदर्शनी. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून कचऱ्यापासून सुंदर कलाकृती, आर्ट-क्राफ्ट आणि विज्ञान मॉडेल्स तयार केले होते.

 या माध्यमातून विद्यार्थ्यांनी 'Reduce, Reuse आणि Recycle' (3R) हा पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजाला दिला. क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी लेझीम, डंबल आणि मानवी मनोऱ्यांची (Pyramids) चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानी नृत्य आणि आदिवासी नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या सोहळ्याला पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष  ॲड. विनय धाबे (अध्यक्ष, बापू शिक्षण संस्था) यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक मॉडेल्सचे कौतुक करताना म्हटले की, "समाज घडवणारे भावी नागरिक याच शाळेत तयार होत आहेत." तर उद्घाटक  विजय गडीकर यांनी विद्यार्थ्यांना सदैव उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  अजय पराते आणि सदाशिव चव्हाण यांनी इयत्ता १० वीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेतर्फे एका विद्यार्थिनीला सायकल भेट दिली.  सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी जलतरण सारख्या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर यश संपादन करावे, यासाठी प्रोत्साहित केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका  अर्चना गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गायत्री खोब्रागडे यांनी केले, तर आभार रचना पराते यांनी मानले. 

Rashtra Seva Vidyalaya celebrates Sports and Cultural Festival with enthusiasm; conveying the '3R' message by creating artwork from waste.

Nagpur, 2: A sports festival and cultural programs were organized in a very enthusiastic atmosphere at Rashtra Seva Vidyalaya in Padmanagar. Organized to provide an opportunity for students to showcase their hidden talents, the festival saw students displaying their sports skills as well as their creativity. The main attraction of this festival was the exhibition prepared by students from classes 5th to 10th. The students created beautiful artwork, arts and crafts, and science models from waste materials.

Through this, the students conveyed the important message of environmental protection – 'Reduce, Reuse, and Recycle' (3R) – to society. In the sports festival, students presented thrilling demonstrations of Lezim, dumbbells, and human pyramids. The subsequent cultural program featured Rajasthani and tribal dances that captivated the audience. Parents also attended the ceremony in large numbers, boosting the students' morale.

The president of the program, Adv. Vinay Dhabe (President, Bapu Shikshan Sanstha), while appreciating the students' scientific models, said, "The future citizens who will shape society are being prepared in this very school." The inaugurator, Vijay Gadikar, urged the students to always dream of soaring to great heights.
The chief guests of the program, Ajay Parate and Sadashiv Chavan, praised the meritorious students of class 10 and presented a bicycle to one of the female students on behalf of the school. Social worker Hemant Chaudhary encouraged the students to achieve success at the district level in sports like swimming. Under the guidance of the school principal, Mrs. Archana Gajbhiye, all the teachers worked tirelessly to make this program a success. The program was compered by Gayatri Khobragade, while the vote of thanks was given by Rachana Parate.

No comments