Breaking News

राज्य राखीव पोलीस दलाला २७३ नवीन शिपाई मिळाले; दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

 राज्य राखीव पोलीस दलाला २७३ नवीन शिपाई मिळाले; दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न


www.n7newsvoice.in

नागपूर,ता.२५: राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ४, हिंगणा रोड येथील कवायत मैदानावर आज २७३ नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या शिपायांनी नऊ महिन्यांचे खडतर मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, आता ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली (भापोसे) उपस्थित होते. त्यांच्यासोबत गट क्र. ४ चे समादेशक बच्चन सिंह (भापोसे) हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना आणि प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. समादेशक बच्चन सिंह यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली यांनी शिपायांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ कौशल्याची नव्हे, तर निरोगी शरीर आणि कणखर मनाचीही आवश्यकता असते." त्यांनी शिपायांना देश आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन करून त्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्याची भावना जागृत केली.

यानंतर, दीक्षांत संचलन परेडला सुरुवात झाली, ज्याचे नेतृत्व परेड कमांडर अक्षय परशुराम लोणगाडगे आणि सेकंड इन परेड कमांडर वैभव विनोद चौधरी यांनी केले. त्यांच्या शिस्तबद्ध परेडने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर, सर्व शिपायांनी शपथग्रहण केले.

समादेशक बच्चन सिंह यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, या खडतर प्रशिक्षणाचा उद्देश महाराष्ट्रासाठी एक उत्कृष्ट आणि सक्षम सशस्त्र पोलीस दल तयार करणे आहे, जे देशाच्या व राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेपुढील सर्व आव्हानांना सामोरे जाऊ शकेल. याप्रसंगी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १० उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदारांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

या दिमाखदार सोहळ्याला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक अनिल कुमार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. हरिओम गांधी, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी, शहीद कुटुंबीय, शालेय विद्यार्थी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       या प्रशिक्षण सत्रासाठी समादेशक बच्चन सिंह यांच्या नेतृत्वाखालील  सहायक समादेशक  डी. बी. ईश्वरकर,  पी. बी. भजने, आर. एम. जाधव,  पोलीस निरीक्षक डी.जी. शेडमाके, एस पी कवडो,  बी. आर. आगरकर, आर. एन. मडावी,पोलीस उप निरीक्षक व्ही. एस. घाईट, आर.एन. गायकर, आर एस तायडे,पी.एन. बघेल, रक्षक जमादार, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4, नागपूर तसेच प्रशिक्षक वर्ग व इतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.   

www.n7newsvoice.in

State Reserve Police Force gets 273 new constables; Convocation ceremony held with enthusiasm

Nagpur, 25: The convocation ceremony of 273 new constables was held with great enthusiasm today at the drill ground of State Reserve Police Force, Group No. 4, Hingna Road. These constables have successfully completed nine months of rigorous basic training and are now ready to maintain law and order. Special Inspector General of Police Nisar Tamboli (BHAPOSE) of State Reserve Police Force was present as the chief guest of the program. Along with him, Commandant of Group No. 4 Bachchan Singh (BHAPOSE) was also present.

The program began with the roar of Shiva and the arrival of the chief guest. Commandant Bachchan Singh welcomed the guests. In his speech, Special Inspector General of Police Nisar Tamboli impressed upon the constables the importance of physical fitness, mental toughness and discipline. He said, "To be successful in any field, one needs not only skill, but also a healthy body and a strong mind." He urged the soldiers to bring glory to the country and the state and instilled a sense of patriotism and duty in them. After this, the convocation parade began, led by Parade Commander Akshay Parashuram Longadge and Second in Parade Commander Vaibhav Vinod Chaudhary. Their disciplined parade won the hearts of the attendees. After this, all the soldiers took the oath. In his introductory speech, Commander Bachchan Singh said that the objective of this tough training is to create an excellent and capable armed police force for Maharashtra, which can face all the challenges facing the law and order of the country and the state. On this occasion, 10 excellent trainee police officers were felicitated by the chief guest. The glittering ceremony was graced by Deputy Inspector General of Police of the Central Reserve Police Force Anil Kumar, Deputy Inspector General of Police of the National Disaster Response Force Dr. Hariom Gandhi, Railway Superintendent of Police Mangesh Shinde, as well as many senior officers, martyred families, school students, retired police officers and citizens were present in large numbers.
For this training session, under the leadership of Commander Bachchan Singh, Assistant Commanders D. B. Ishwarkar, P. B. Bhajne, R. M. Jadhav, Police Inspectors D. G. Shedmake, S. P. Kavado, B. R. Agarkar, R. N. Madavi, Police Sub-Inspectors V. S. Ghait, R. N. Gaiker, R. S. Tayde, P. N. Baghel, Rakshak Jamadar, State Reserve Police Force, Group No. 4, Nagpur as well as the training class and all other officers and employees worked hard.



#SRPF #Maharashtrapolice2025 #Policebharti2025 #Police #CRPF 

No comments