Breaking News

नागपूरच्या तनुश्री शेंडेला स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार : N7 News Voice

नागपूरच्या तनुश्री शेंडेला स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार 

नागपूर: जरीपटका, मिसाळ ले-आउट येथील सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी तनुश्री नितीन शेंडे हिने स्काऊट-गाईड क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय 'राज्य पदक व पुरस्कार' पटकावला आहे. 'ओपन बिकन ट्रूप'च्या उत्तम मार्गदर्शनाखाली तिने हे प्राविण्य संपादन केले. या घवघवीत यशाबद्दल शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून संस्थेचे संचालक जोतिराव बारसागडे यांच्या हस्ते तनुश्रीचा सत्कार करण्यात आला.

शिस्त आणि सेवेचे धडे: तनुश्री शेंडे

सत्काराला उत्तर देताना तनुश्री म्हणाली, "लॉर्ड बेडन-पॉवेल आणि मिसेस बेडन-पॉवेल यांनी सुरू केलेल्या या चळवळीने जगभरात शिस्तप्रिय, आत्मनिर्भर आणि सेवाभावी नागरिक घडवण्यात मोठे योगदान दिले आहे. स्काऊट-गाईडच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो."

या प्रसंगी मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, स्वप्नील कठाणे, नेहा बोदेले आणि कोमल बाहेकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रिजेश कापसे यांनी केले, तर आभार शेख मॅडम यांनी मानले. तनुश्रीच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tanushree Shende Awarded State Scout-Guide Award


Tanushree Nitin Shende, a Class 10 student of St. Roben Public School & Junior College, Misal Layout, Jaripatka, has bagged the prestigious state-level 'Rajya Padak Award' for her outstanding performance in Scouting and Guiding. She achieved this feat under the expert guidance of the Open Beacon Troop. To celebrate her remarkable achievement, a special felicitation ceremony was organized at the school, where the institution's Director, Mr. Jotirao Barsagade, honored Tanushree.

Lessons of Discipline and Service: Tanushree Shende

Responding to the felicitation, Tanushree expressed, "This movement, initiated by Lord Baden-Powell and Lady Baden-Powell, has played a massive role worldwide in shaping disciplined, self-reliant, and service-oriented citizens. Scout-Guide training facilitates the overall development of students."

The event was attended by Principal Dhanashree Barsagade, Swapnil Kathane, Neha Bodele, and Komal Bahekar. The program was hosted by Brijesh Kapse, while Sheikh Madam proposed the vote of thanks. Congratulations and praises have been pouring in for Tanushree from all quarters.

No comments