डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माचे पुनर्जीवन : N7 News Voice
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माचे पुनर्जीवन :
नागपुरात चार दिवसीय निशुल्क धम्म शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, ता. ६ : महेंद्र नगर येथील अनाकारिक धम्मपाल बुद्ध विहारमध्ये “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माचे पुनर्जीवन” या विषयावर चार दिवसीय निशुल्क अनिवासी धम्म शिबिराचे आयोजन १ मार्च ते ४ मार्च या कालावधीत करण्यात आले होते. या शिबिराला २०० पेक्षा अधिक धम्मप्रेमी शिबिरार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात धम्मचारी ज्ञानोदय यांनी विषयाचे नेतृत्व करत आपल्या सखोल अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी वक्तृत्व शैलीने उपस्थित शिबिरार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. होळीच्या सणाची धामधूम असतानाही अनेक शिबिरार्थी उत्साहाने शिबिरात सहभागी झाले. शिबिराचे सूत्रसंचालन धम्मचारी प्रज्ञासखी यांनी केले. शिबिरादरम्यान रोचक पूजा, ध्यान साधना, संपर्क सराव, तसेच गटचर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच डॉ. काळे यांनी रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांवर प्रतिबंध कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन करत आरोग्यविषयक कार्यशाळा घेतली.
शिबिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिबिरार्थ्यांनी सुंदर गीत, नृत्य आणि मनोगत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शिबिरार्थ्यांनी घरून जेवणाचे डबे आणून सहभोजनाचा आनंद घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्मचारी प्रज्ञासखी, श्रमणकेतू, सुगतप्रिय, विवेकबंधू, ज्ञानवजरी, दानरत्न, गुणरत्न, अमलतारा, बोधिपद्मा, स्वेतचित्ता, पद्मशूर, श्रमणबोधी, बोधीमणी, बुद्धदत्त, तेजधम्म, आर्यदित्य, अनोमवज्र आणि धम्ममित्रा आदी धम्मचारी तसेच महिला-पुरुषांनी सक्रिय सहभाग घेतला.

No comments