नागपुरात SRPF ७८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न :N7 News Voice
नागपुरात राज्य राखीव पोलीस बलाचा ७८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न; गट क्र. ४ ला सर्वाधिक ९ पारितोषिके
N7 News Voice
नागपूर, ६ : राज्य राखीव पोलीस बलाचा (SRPF) ७८ वा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा मंगळवारी नागपूर येथील गट क्र. ४ च्या मैदानावर दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हा सोहळा प्रथमच नागपूरच्या गट क्र. ४ कडे आयोजित करण्याची संधी आली होती. कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर (भा.पो.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत जवानांनी सादर केलेल्या संचलनाने शिस्त, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची परंपरा अधोरेखित केली. सोहळ्यातील ‘हर्ष फायर’ परेडचे नेतृत्व सुशांत सिंह (भा.पो.से.) यांनी केले, तर सहायक संचलन प्रमुख म्हणून मंगेश शेलोटकर (सहायक समादेशक, गट क्र. १८) यांनी जबाबदारी पार पाडली. या संचलनात नागपूर, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया येथील एकूण १४ पोलीस अधिकारी व १८६ जवान सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान राज्यातील विविध गटांमध्ये आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. एकूण ५१ पारितोषिकांपैकी गट क्र. ४ नागपूरने समादेशक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक ९ पारितोषिके पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. अध्यक्षीय भाषणात राजकुमार व्हटकर यांनी जवानांच्या कौशल्याचे कौतुक केले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट आरोग्य राखत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बच्चन सिंह यांनी केले. या सोहळ्याला नागपूरचे सह-पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेडे, पोलीस उपमहानिरीक्षक विजय कुमार मगर तसेच महाराष्ट्रातील १९ गटांचे समादेशक उपस्थित होते.
78th State Reserve Police Force (SRPF) Anniversary Celebrations Celebrated with Enthusiasm; Group No. 4 Wins Highest 9 Awards
N7 News Voice
Nagpur, Date 6: The 78th State-level Anniversary Celebrations of the State Reserve Police Force (SRPF) were celebrated with great enthusiasm and enthusiasm on Tuesday at the grounds of Group No. 4 in Nagpur. This special celebration was organized for the first time by Group No. 4 of Nagpur. Additional Director General of Police of the State Reserve Police Force, Shri Rajkumar Vhatkar (B.P.S.) was present as the chief guest of the program. The procession presented by the jawans in his presence highlighted the tradition of discipline, dedication and devotion to duty. The 'Harsh Fire' parade of this ceremony was led by Shri. Sushant Singh (B.P.S.) while Shri Mangesh Shelotkar (Assistant Commandant, Group No. 18) took charge as the Assistant Chief of the procession. A total of 14 police officers and 186 jawans from Nagpur, Amravati, Gadchiroli and Gondia participated in this procession. During the program, prizes for competitions held in various groups in the state were distributed. Out of a total of 51 prizes, Group No. 4 Nagpur proved its dominance by winning the maximum 09 prizes under the guidance of its Director General Mr. Bachchan Singh. In his presidential address, Mr. Rajkumar Vatkar praised the skills of the jawans. He encouraged the police officers and officials to maintain excellent health and be loyal to their duties. Special Inspector General of Police Mr. Nisar Tamboli introduced the program, while Mr. Bachchan Singh proposed the vote of thanks. Nagpur Joint Commissioner of Police Mr. Naveen Chandra Reddy, Regional Director of RBI Mr. Sachin Shede, Deputy Inspector General of Police Mr. Vijay Kumar Magar and 19 Group Commanders of Maharashtra were present at the ceremony.


No comments