Breaking News

हंसकृपा स्कूलमध्ये ७७ वा गणराज्य दिन उत्साहात; सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकाने वेधले लक्ष

हंसकृपा इंग्लिश प्रायमरी, सेकेंडरी स्कूल 

नागपूर,ता.२७: कोराडी रोडवरील हंसकृपा इंग्लिश प्रायमरी, सेकेंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे ७७ वा गणराज्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधन ठरले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक  डी.जी. जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. याप्रसंगी संचालिका नीलिमा जिचकार, मुख्याध्यापिका रूपाली जवंजाळ आणि उपमुख्याध्यापिका प्रिती चौरसिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून गोरखनाथ सोळंकी, डॉ. आशिष तवानी, ममता ठाकूर आणि स्नेहल ठाकरे या नवनिर्वाचित नगरसेविकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'वृद्धाश्रम मुक्त भारत' नाटकाने वेधले लक्ष

विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तीपर गीते, लेझिम, डंबेल्स आणि एरोबिक डान्सचे शानदार सादरीकरण केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'वृद्धाश्रम मुक्त भारत' या नाटकाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला. तसेच पिरॅमिड्स आणि इतर साहसी कृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अंकिता रामेकर व सरिता चोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिलाषा येनुरकर यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. #N7Newsvoice #RepublicDay2026 #HanskrupaSchool #EducationUpdate #PatrioticEvent #NagpurSchools

------------


Hanskrupa School Celebrates 77th Republic Day with Enthusiasm; Socially Relevant Play Steals the Show

Nagpur,  27: The 77th Republic Day was celebrated with great enthusiasm and a patriotic atmosphere at Hanskrupa English Primary, Secondary School & Junior College on Koradi Road. The highlight of the ceremony was the students' diverse cultural programs and social awareness initiatives. The program began with the flag hoisting ceremony by the institution's director, D.G. Jichkar.  Director Neelima Jichkar, Principal Rupali Jawanjal, and Vice-Principal Preeti Chaurasia were prominently present on the occasion. Several dignitaries, including newly elected corporators Gorakhnath Solanki, Dr. Ashish Tawani, Mamta Thakur, and Snehal Thackeray, were present as chief guests.

'Old Age Home-Free India' Play Captivates Audience

The students presented a spectacular performance of parades, patriotic songs, Lezim, dumbbells, and aerobic dance. In particular, the play 'Old Age Home-Free India' presented by the students touched the hearts of the audience and conveyed a message of social responsibility. Pyramids and other adventurous acts also captivated everyone's attention.

Students who excelled in various competitions were honored with mementos and certificates by the dignitaries. The program was compered by Ankita Ramekar and Sarita Chopde, while the vote of thanks was given by Abhilasha Yenurkar. The ceremony was successfully concluded with the cooperation of all the teachers and non-teaching staff of the school. #N7Newsvoice #RepublicDay2026 #HanskrupaSchool #EducationUpdate #PatrioticEvent #NagpurSchools

No comments