Breaking News

राजकारणापलीकडचा 'ज्ञानयज्ञ'! मुनगंटीवारांच्या पुढाकाराने विदर्भाचे आध्यात्मिक वातावरण चैतन्यमयी; उद्या महाआरतीने समारोप.

चंद्रपूरच्या भूमीवर सध्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळत आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या भव्य श्रीरामकथेने केवळ भाविकांची मनेच जिंकली नाहीत, तर समाजमनावर सुसंस्कारांची मोहोर उमटवली आहे.


आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील भव्य श्रीरामकथेला अलोट गर्दी

पूज्य राजन महाराजांच्या रसाळ वाणीने लखमापूर धाम भक्तिरसात चिंब

'रामधर्माचा' जागर; जनसागराचा अभूतपूर्व प्रतिसाद

चंद्रपूर : गेल्या आठ दिवसांपासून चंद्रपूर नगरीत वाहाणारा भक्तीच्या कुंभमेळ्यात अलोट गर्दी होत आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित लखमापूर धाम चांदा क्लब ग्राऊंडवरील भव्य श्रीरामकथेचा उद्या, गुरुवार दि. २२ जानेवारीला महाआरतीने दिमाखदार समारोप होईल. १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञाने केवळ चंद्रपूरचेच नव्हे, तर विदर्भाचे आध्यात्मिक वातावरण चैतन्यमयी केले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन समाजमनावर सुसंस्कारांची पेरणी करण्यासाठी केलेल्या या भव्य आयोजनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीरामकथेचे आयोजन केवळ एक धार्मिक सोहळा नसून, एक सांस्कृतिक उपक्रम ठरत आहे. विशेष म्हणजे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे सपत्नीक दररोज या कथेला उपस्थिती लावून इतरांनाही प्रेरणा देत आहे.

"रामकथा ही समाजाला एकत्र बांधणारी आणि मूल्यसंवर्धन करणारी परंपरा आहे," हा त्यांचा विचार या कार्यक्रमाच्या भव्यतेतून प्रत्यक्ष साकारत आहे. पूज्य राजन महाराज यांच्या रसाळ वाणीतून रामानामाच्या घोषात मोठ्या भक्तीभावाने रामकथा रोज संपन्न होत आहे. या रामकथेला हजारो भाविक रामानामात राममय झाले आहेत.चंद्रपुरात सुरू असलेल्या रामकथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या कथाकार पूज्य राजन महाराज यांच्या ओजस्वी व अमृतमय वाणीचा थेट लाभ मिळत आहे.

प्रसिद्ध प्रवचनकार पूज्य राजन महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग जिवंत केले. "धनासोबतच परमार्थाचीही साधना करा" हा त्यांनी दिलेला मंत्र चंद्रपूरकरांच्या मनावर कोरला गेला. बाललीला, सीता स्वयंवर, वनवास आणि रामराज्याचे वर्णन करताना महाराजांच्या ओघवत्या शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कथेच्या आयोजनात ठेवलेली शिस्त, भव्य व्यासपीठ आणि मनमोहक विद्युत रोषणाई यामुळे चांदा क्लब ग्राऊंडवर खऱ्या अर्थाने अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

मकर संक्रांतीला श्रीरामकथेला प्रारंभ झाला. या आठ दिवसांत केवळ कथाश्रवणच झाले नाही, तर सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले. विविध समुदायांच्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेली आरती हा या सोहळ्याचा विशेष भाग ठरला. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले जात आहे.


A massive crowd attends the grand Shri Ram Katha envisioned by MLA Sudhir Mungantiwar


Lakhamapur Dham is drenched in devotion by the eloquent discourse of Pujya Rajan Maharaj

An awakening of 'Ram Dharma'; an unprecedented response from the masses

Chandrapur: For the past eight days, Chandrapur city has been witnessing a massive influx of devotees in a veritable Kumbh Mela of devotion. The grand Shri Ram Katha, organized at Lakhamapur Dham, Chanda Club Ground, through the initiative of the state's former Minister of Forests and Cultural Affairs, MLA Shri Sudhir Mungantiwar, will conclude tomorrow, Thursday, January 22nd, with a magnificent Maha Aarti. This spiritual event, which began on January 14th, has revitalized the spiritual atmosphere not only of Chandrapur but of the entire Vidarbha region.

This grand event, organized by MLA Sudhir Mungantiwar, going beyond politics to sow the seeds of good values ​​in the minds of the people, is receiving an overwhelming response from every corner of the district. The organization of the Shri Ram Katha is proving to be not just a religious ceremony, but a significant cultural event. Notably, MLA Shri Sudhir Mungantiwar, along with his wife, is attending the Katha daily, inspiring others as well.

His belief that "Ram Katha is a tradition that unites society and promotes values" is being realized through the grandeur of this program. The Ram Katha is being conducted daily with great devotion amidst the chanting of Rama's name, through the eloquent discourse of Pujya Rajan Maharaj. Thousands of devotees have become immersed in devotion to Rama during this Ram Katha.  Since the Ram Katha in Chandrapur is being telecast live, Ram devotees across the state are directly benefiting from the powerful and nectar-like words of the narrator, Pujya Rajan Maharaj, from the comfort of their homes.

The renowned orator, Pujya Rajan Maharaj, brought to life the events from Lord Rama's life with his captivating speech. The mantra he gave, "Along with wealth, also pursue spiritual practice," has been etched in the hearts of the people of Chandrapur. While describing the childhood exploits of Lord Rama, Sita's swayamvar, his exile, and the reign of Rama, the Maharaja's eloquent style captivated the audience. In particular, the discipline maintained in the organization of the narrative by MLA Shri. Sudhir Mungantiwar, the magnificent stage, and the enchanting lighting created a truly spiritual atmosphere at the Chanda Club Ground.

The recitation of the Ramayana began on Makar Sankranti. These eight days not only witnessed the narration of the story but also showcased social harmony. The aarti performed by citizens from various communities coming together was a special highlight of this event. This initiative, conceived by MLA Shri. Sudhir Mungantiwar, is adding a golden chapter to the spiritual history of Chandrapur.

No comments