Breaking News

BREAKING: प्रजासत्ताक दिनी मंत्र्याचा माज उतरवला! मंत्री गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचे नाव टाळले, वनरक्षक कडाडली; "माती खोदीन पण झुकणार नाही!"

  प्रजासत्ताक दिनी मंत्र्याचा माज उतरवला! मंत्री गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचे नाव टाळले, वनरक्षक कडाडली; "माती खोदीन पण झुकणार नाही!"

माधवी जाधव

जळगाव/मुंबई: देशाच्या प्रजासत्ताक दिनी, ज्या दिवशी संपूर्ण देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे गुणगान गातो, त्याच दिवशी जळगावमध्ये एक संतापजनक प्रकार घडला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले. मंत्र्यांच्या या कृत्यामुळे कर्तव्यावर असलेल्या वनविभागाच्या वन रक्षक  माधवी जाधव यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी भर कार्यक्रमात मंत्र्यांना आरसा दाखवला.

"संविधान देणाऱ्याचा विसर पडला कसा?"

मंत्री महाजन यांचे भाषण संपताच माधवी जाधव यांनी थेट त्यांच्यासमोर जाऊन जाब विचारला. त्या म्हणाल्या,

"ज्या व्यक्तीने देशाला संविधान दिले, ज्यांनी लोकशाही दिली, त्यांचे नाव घेण्याचे तुम्ही टाळले? हे देशद्रोहासारखे आहे. तुम्हाला देशाची माफी मागावीच लागेल. "

निलंबनाची भीती नाही, स्वाभिमान मोठा!

माधवी जाधव यांची ही निर्भीड भूमिका पाहून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, जाधव आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी अत्यंत बाणेदारपणे ठणकावून सांगितले की:

  • "मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही."

  • "शिक्षा म्हणून मला वाळूचे ट्रक रिकामे करायला लावले किंवा माती खोदण्याचे काम दिले तरी मी ते करेन. "

  • "पण बाबासाहेबांची ओळख मिटू देणार नाही. मंत्र्यांनी त्यांची चूक मान्य करायलाच हवी."

राष्ट्रपतींचा दाखला आणि मंत्र्यांची जातवादी वृत्ती?

देशाच्या राष्ट्रपती जेव्हा प्रजासत्ताक दिनाचे भाषण करतात, तेव्हा त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी सुरुवात करतात. मंत्र्यांनी खरं तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा आदर करायचा असतो, पण महाजनांनी जाणीवपूर्वक नाव न घेणे हे त्यांच्यातील 'जातिवादी' मानसिकतेचे दर्शन घडवते, अशी टीका आता सर्वच स्तरांतून होत आहे.

क्रांतिकारी सलाम!

एकीकडे सत्तेसमोर भल्याभल्यांची दातखीळ बसते, तिथे माधवी जाधव यांनी दाखवलेले हे धाडस कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर सध्या माधवी जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, "क्रांतिकारी सलाम" दिला जात आहे. बाबासाहेबांच्या सन्मानासाठी आपली नोकरी पणाला लावणाऱ्या या वाघिणीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

BREAKING: Minister's arrogance brought down on Republic Day! Minister Girish Mahajan avoided mentioning Babasaheb's name, forest guard lashed out; "I will dig the earth, but I will not bow down!"

 Jalgaon/Mumbai: On the country's Republic Day, the day when the entire nation celebrates the constitution given by Dr. Babasaheb Ambedkar, an outrageous incident occurred in Jalgaon. The district's guardian minister, Girish Mahajan, deliberately avoided mentioning the name of Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the Indian Constitution, in his speech.  The minister's actions angered Madhavi Jadhav, a forest guard from the Forest Department who was on duty, and she confronted the minister during the event. "How could you forget the one who gave us the Constitution?" As soon as Minister Mahajan's speech ended, Madhavi Jadhav directly questioned him. She said, "You avoided mentioning the name of the person who gave this country the constitution, who gave us democracy? This is like treason. You will have to apologize to the country." No fear of suspension, self-respect is paramount! Madhavi Jadhav's fearless stance has caused a stir in administrative circles. However, Jadhav remains firm in her position. She emphatically stated: "It's alright if I get suspended, but I will not apologize." "Even if I am made to unload sand trucks or given the job of digging earth as punishment, I will do it." "But I will not let Babasaheb's identity be erased. The minister must acknowledge his mistake." The President's example and the Minister's casteist attitude? When the President of the country delivers the Republic Day speech, she begins with the thoughts of Dr. Babasaheb Ambedkar. Ministers are supposed to respect the President's address, but the fact that Mahajan deliberately avoided mentioning the President's name reveals his 'casteist' mentality, a criticism that is now being voiced from all quarters. Revolutionary salute! While many are silenced in the face of power, the courage shown by Madhavi Jadhav is commendable. Madhavi Jadhav is currently receiving a shower of congratulations on social media, and people are giving her a "revolutionary salute." This courageous woman, who risked her job for the honor of Babasaheb Ambedkar, is being discussed throughout Maharashtra.

No comments