Breaking News

नॅशनल एनजीओ समिट फोरम 2025 नागपूरमध्ये यशस्वीरीत्या संपन्न

 नॅशनल एनजीओ समिट फोरम 2025 नागपूरमध्ये यशस्वीरीत्या संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज “नॅशनल एनजीओ समिट फोरम 2025” भव्य प्रमाणावर पार पडले. देशभरातील १०० पेक्षा अधिक एनजीओ प्रतिनिधींनी या समिटमध्ये सहभागी होऊन सामाजिक क्षेत्रातील नवकल्पना आणि क्षमता वाढीवर चर्चा केली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बौद्ध विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मंगेश दाहीकले, एमसीईडीचे हेमंत वाघमारे, जेएनयूचे डॉ. सुरेंद्र वानखेडे, डॉ. मिथुन खेर्डे, मिथुनकुमार नागवंशी, कृषी विभागाचे डॉ. संकेत गजभिये, तर अध्यक्ष म्हणून हीरा गेडाम उपस्थित होत्या.

समिटचे प्रमुख उद्दिष्ट एनजीओंची क्षमता वाढविणे, CSR निधी प्रक्रिया समजावून घेणे, सरकारी योजना यांचा लाभ घेणे, दस्तऐवजीकरण सुधारणा तसेच सामाजिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर यावर मार्गदर्शन करणे होते.

बौद्ध विचारवंत मंगेश दाहीकले यांनी ChatGPT आणि AI चा एनजीओंसाठी कसा उपयोग करता येईल यावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रस्ताव लेखन, रिपोर्ट तयार करणे, संशोधन, फंडिंग डॉक्युमेंटेशन आणि सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी AI चा प्रभावी वापर कसा करता येईल हे स्पष्ट केले.

हेमंत वाघमारे यांनी एनजीओ–उद्योजक सहकार्याद्वारे सरकारी योजना, उद्योजकता प्रशिक्षण आणि वित्तीय संधी मिळविण्याच्या मार्गांवर माहिती दिली. डॉ. सुरेंद्र वानखेडे यांनी नोंदणी, दस्तऐवजीकरण, ऑडिट, पारदर्शकता आणि फंडिंग प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. डॉ. मिथुन खेर्डे यांनी पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षित मुद्द्यांवर प्रकाश टाकला, तर मिथुनकुमार नागवंशी यांनी CSR फंड मिळविण्याची प्रक्रिया, प्रस्ताव तयार करणे, कॉर्पोरेट संवाद आणि प्रकल्प अंमलबजावणीवरील संपूर्ण मार्गदर्शन केले.समिटने सहभागी संस्थांना AI, CSR, सरकारी निधी, दस्तऐवजीकरण आणि सामाजिक विकासाच्या विविध अंगांवर कार्यक्षमतेने काम करण्याची दिशा दाखवली.

कार्यक्रम यशस्वितेकरिता  हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुउद्देशीय संस्थेच्या  हीरा गेडाम,राधेश्याम बहुउद्देशीय सेवा संस्थाच्या डॉ. किरण मेश्राम,  मैत्रेयी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या विजयलक्ष्मी हजारे, ग्लोबल वेल्फेअर असोसिएशनचे अधिर बागडे, अश्वघोष कला अकॅडमी फाउंडेशनचे  डॉ. सुरेंद्र वानखेडे, स्वरांजली बहुउद्देशीय संस्थेचे  सुधीर पाटील, इंडियन वेल्फेअर असोसिएशनचे विश्वास पाटील, तपस्वू बहुउद्देशीय संस्थेचे संजय सोमकुवर,ज्ञानोदय जनकल्याण संस्थेचे राहुल वासनिक, प्रशब्दी बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या पूर्णिमा गेडाम, मेत्तासेतू फाउंडेशनचे डॉ. प्रदीप नगराळे यांनी परिश्रम घेतले.  सूत्रसंचालन डॉ. किरण मेश्राम यांनी केले, तर आभारप्रदर्शन विजयलक्ष्मी हजारे यांनी केले.


National NGO Summit Forum 2025 Successfully Concludes in Nagpur

Nagpur :  The “National NGO Summit Forum 2025” was held on a grand scale today at the Dr. Babasaheb Ambedkar International Convention Centre, Nagpur. Over 100 representatives from NGOs across India participated in the summit to discuss innovation and capacity-building in the social sector.

The event was guided by prominent personalities, including Buddhist thinker and social activist Mangesh Dahikale, Hemant Waghmare from MCED, Dr. Surendra Wankhede from JNU, Dr. Mithun Kherde, Mithunkumar Nagwanshi, Dr. Sanket Gajbhiye from the Agriculture Department, with Heera Gedam presiding as the chairperson.

The main objectives of the summit were to enhance NGO capacities, explain CSR funding processes, highlight government schemes, improve documentation practices, and provide guidance on the effective use of Artificial Intelligence (AI) in the social sector.

Buddhist thinker Mangesh Dahikale shared insights on how NGOs can leverage AI tools, including ChatGPT, for proposal writing, report preparation, research, funding documentation, and social media management. Hemant Waghmare discussed pathways for NGO-entrepreneur collaborations, access to government schemes, entrepreneurship training, and financial opportunities. Dr. Surendra Wankhede guided participants on registration, documentation, auditing, transparency, and funding processes. Dr. Mithun Kherde highlighted the often-neglected issue of men’s mental health, while Mithunkumar Nagwanshi provided comprehensive guidance on CSR fund acquisition, proposal writing, corporate engagement, and project implementation.

The summit effectively provided NGOs with strategies to work efficiently in areas such as AI, CSR, government funding, documentation, and overall social development.

The success of the event was made possible through the efforts of Heera Gedam of Hastashilp Gramudyog Bahuuddeshiya Sanstha, Dr. Kiran Meshram of Radheshyam Bahuuddeshiya Seva Sanstha, Vijaylakshmi Hajare of Maitreyi Mahila Bahuuddeshiya Sanstha, Adhir Bagde of Global Welfare Association, Dr. Surendra Wankhede of Ashvaghosh Kala Academy Foundation, Sudhir Patil of Swaranjali Bahuuddeshiya Sanstha, Vishwas Patil of Indian Welfare Association, Sanjay Somkuvar of Tapasvu Bahuuddeshiya Sanstha, Rahul Vasnik of Gyanodaya Jankalyan Sanstha, Purnima Gedam of Prashabdi Bahuuddeshiya Shikshan Sanstha, and Dr. Pradeep Nagarale of MettaSetu Foundation.

The event was coordinated by Dr. Kiran Meshram, and the vote of thanks was delivered by Vijaylakshmi Hajare.








No comments