Breaking News

शैक्षणिक अन्यायाविरुद्ध युवकांचा लढा उफाळला :N7 NEWS VOICE

शैक्षणिक अन्यायाविरुद्ध युवकांचा लढा उफाळला :
हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू असतानाच ‘युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना’चे निवेदन

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरू असताना शिक्षण क्षेत्रातील तातडीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्रतर्फे शासनाला महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
TAIT 3 भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि न्याय्य पद्धतीने राबवावी तसेच अनेक प्रलंबित मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

मुख्य मागण्या — संक्षेपात :

🔹 पवित्र पोर्टलवरूनच 1 ते 12वीपर्यंतच्या 100% कायम रिक्त पदांची भरती.
कंत्राटी पद्धतीला पूर्ण विराम देण्याची मागणी.

🔹 समूह शाळा योजना रद्द करून वस्ती, तांडे, आदिवासी भागात मूलभूत शिक्षण सुविधा उपलब्ध कराव्यात.

🔹 ‘एक भरती – एक पद – एक बिंदू’ प्रक्रिया लागू करून मनमानी निवडीला आळा.

🔹 आश्रमशाळा व समाजकल्याण विभागातील शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर आणावी.

🔹 गैरप्रकार रोखण्यासाठी मुलाखत दिलेल्या प्रत्येक उमेदवाराची व्हिडिओ क्लिप संस्थेकडून देणे बंधनकारक करावे.

🔹 रिक्त आरक्षण प्रवर्गातील जागा रूपांतरित करून प्रतीक्षा यादी तातडीने जाहीर करावी.

🔹 मनपा–नपा आस्थापनांमधील 100% जागा तत्काळ भराव्यात.

🔹 कला, क्रीडा, शारीरिक, संगणक, कार्यानुभव विषयांच्या शिक्षकांची भरती पूर्ण क्षमतेने करावी.

🔹 शिक्षण सेवकांचे मानधन ₹16,000 वरून ₹40,000 करावे.

हिवाळी अधिवेशनात राज्याचे लक्ष वेधणाऱ्या मागण्या

संघटनेचे म्हणणे असे की,
👉 “शिक्षण क्षेत्रातील अन्याय, गैरप्रकार, रिक्त जागांची संख्या आणि मुलाखतीतील मनमानी याकडे सरकारने तत्काळ लक्ष देणे अत्यावश्यक आहे. विशेषतः हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू असतानाच या मागण्यांची दखल घेण्याची योग्य वेळ आहे.”

युवा संघटनेने शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे व राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पवित्र पोर्टल टिकवण्याच्या भूमिकेचे कौतुक केले असले तरी, “आता अंमलबजावणीच सर्वात महत्त्वाची”, असे ठाम मत  लक्षिश चव्हाण  व्यक्त केले. 


No comments