Breaking News

आई-वडिलांनंतर शिक्षक हे संस्काराचे विद्यापीठ : स्वप्नील पातोडे



नागपूर,ता. ६ : शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे मान-सन्मानाचे स्थान असते.खरं तर शिक्षक हा लाखो मन घडविणारा शिल्पकारच असतो ज्या प्रमाणे कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडकं घडवत असतो तेच काम शिक्षक करतो. शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून आई-वडिलांनंतर संस्काराचे एक विद्यापीठ आहे असे मत समाजसेवक स्वप्नील पातोडे यांनी व्यक्त केले ते कोराडी महामार्गावरील बंधू नगर येथील हंसकृपा इंलिश प्रायमरी स्कुलमध्ये शिक्षक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत  होते. कार्यक्रमाला शाळेचे संचालक  डी. जिचकार, संचालिका  निलिमा जिचकार, मोनिका जिचकार शाळेच्या मुख्याध्यापीका रुपाली जयंजाळ, प्रमुख पाहुणे  महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबईचे सदस्य जगदिश  थपलियाल, अजय पाठक, सामाजिक कार्यकर्ता विनोद खन्ना, प्रमोद राऊत, स्वप्नील पातोडे उपस्थित होते.  मान्यवरांच्या  हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी शिक्षकांची, शिपाई व मुख्याध्यापिका  भूमिका  उत्कृष्ट पार पडली.  प्रमुख पाहुण्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जिवनावर प्रकाश टाकत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन करिश्मा वर्मा, दिया चौधरी या विद्यार्थीनीनी केले.  आभार प्रदर्शन शेंडे यांनी केले.

After parents, teachers are the university of culture: Swapnil Patode

Nagpur : A teacher always has a place of respect and honor in the society. In fact, a teacher is a sculptor who shapes millions of minds, just like a potter shapes clay on a spinning wheel to make pots. Social worker Swapneel Patode expressed the opinion that teachers are not just individuals but a university of culture after parents. He was speaking at the Teacher's Day program at Hanskripa English Primary School in Bandhu Nagar on Koradi Highway. The program was attended by School Director D. Jichkar, Director Nilima Jichkar, Monika Jichkar School Principal Rupali Jayanjal, Chief Guest Jagdish Thapliyal, Member of Maharashtra State Hindi Sahitya Akademi Mumbai, Ajay Pathak, Social Worker Vinod Khanna, Pramod Raut, Swapnil Patode were present. The program was started by lighting the lamp and worshiping Saraswati by the dignitaries. The students performed the role of teacher, constable and headmistress in the program. Chief guest Dr. Sarvapalli guided the students by shedding light on the life of Radhakrishna. All teaching staff and non-teaching staff cooperated for the success of the program. The program was conducted by students Karisma Verma, Diya Chaudhary. The vote of thanks was done by Shende.

No comments