Breaking News

वाडीत महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण मोठ्या उत्साहात..

डॉ.आंबेडकर नगरात ढोल व ताश्यांच्या

 गजरात भव्य मिरवणूक.


  महापुरुषांना अभिवादन करतांना उपस्थित  मान्यवर व पदाधिकारी

नागपूर,ता.३ : वाडी येथील डॉ.आंबेडकर नगर ,मातोश्री रमाबाई चौक येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याची आकर्षक व सुशोभित रथामधून ढोल व ताश्यांच्या  गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका पासून ते रमाबाई चौकापर्यंत काढण्यात आलेल्या  मिरवणुकीत परिसरातील सर्व महिला मंडळ,लहान थोर व प्रतिष्ठित मंडळीं उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गोदाबाई वानखेडे यांच्या धम्मदानातून  प्राप्त झालेल्या या दोन्ही पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या शुभहस्ते  करण्यात आले.दरम्यान पूर्ण बोधी भन्ते यांनी धार्मिकविधी पूर्ण करून  रमाबाई संघटीत महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदनेचे पठण केले.यावेळी व्यासपीठावर  सुरेंद्र मोरे, पं.स.माजी उपसभापती रुपेश झाडे,युवक काँग्रेसचे विभागीय सचिव अश्विन बैस,माजी नगरसेवक दिनेश कोचे,दत्ताजी वानखेडे,वंचित बहुजनआघाडीचे नितेश जंगले,आशिष नंदागवळी,भीमराव कांबळे,नाना चव्हाण, गुरुदास बावणे,नंदू सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मुख्य आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष  संतोष नरवाडे यांनी केले.  आभार नरेशकुमार चव्हाण यांनी मानले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंडळाचे सभासद धम्मा वानखेडे,चिंतामन तागडे,सुनील वानखेडे,मयूर कांबळे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू खोब्रागडे,केशव राऊत,बबलू वानखेडे,अमर बावणे,कृष्णा खोडके,आकाश वानखेडे, रितीक वानखेडे,प्रदीप वानखेडे,ममता मडके,मंदा बागडे,संध्या साखरे,आयुष नरवाडे, ललीत डहाट,साजन पाटील,खुशाल विजयकर,कमलेश विजयकर आदींनी परिश्रम घेतले.



The statue of the great man was unveiled in the wadi with great enthusiasm..


A grand procession in Dr. Ambedkar Nagar with drums and clapping.


Nagpur  3: The unveiling ceremony of the full-length statue of Dr. Babasaheb Ambedkar and the half-length statue of Sahityaratna Annabhau Sathe at Matoshree Ramabai Chowk, Dr. Ambedkar Nagar in Wadi was concluded with great enthusiasm.
A full-length statue of Dr. Babasaheb Ambedkar and a half-length statue of Sahityaratna Annabhau Sathe were taken out in a grand procession in an attractive and decorated chariot to the sound of drums and clapping. In the procession from Dr. Babasaheb Ambedkar Memorial to Ramabai Chowk, all the women's groups, small nobles and prestigious congregations of the area spontaneously participated.
These two statues, received from the donation of senior social worker Godabai Wankhede, were unveiled with the auspicious hands of senior NCP leader and former minister Rameshchandra Bang. Meanwhile, Purna Bodhi Bhante completed the religious ceremony and the Ramabai Sanghati Mahila Mandal recited the collective Buddhavandana. On this occasion, Surendra More, Pt. Ex-Vice President Rupesh Zade, Divisional Secretary of Youth Congress Ashwin Bais, Ex-Corporator Dinesh Koche, Dattaji Wankhede, Vanchit Bahujan Aghadi's Nitesh Jangle, Ashish Nandagawali, Bhimrao Kamble, Nana Chavan, Gurudas Bavane, Nandu Somku were mainly present. Santosh Narwade, District President of Social Justice Department of NCP. Thank you Naresh Kumar Chavan. Dhamma Wankhede, Chintaman Tagde, Sunil Wankhede, Mayur Kamble, members of Sahitya Ratna Annabhau Sathe Yuva Mandal welcomed all the guests with bouquets of flowers. Raju Khobragade, Keshav Raut, Bablu Wankhede, Amar Bavane, Krishna Khodke, Akash Wankhede, Hrithik Wankhede, Pradeep Wankhede, Mamta Madke, Manda Bagde, Sandhya Sakhre, Ayush Narwade, Lalit Dahat, Sajan Patil, Khushal Vijaykar, Kamlesh Vijaykar for making the event a success. Others worked hard.

   Dignitaries and officials present while greeting the great men

No comments