Breaking News

भीमा कोरेगाव' नाटकाचा प्रयोग ८ व ९ एप्रिलला


 पत्रकार परिषदेत माहिती देतांना अशोक जांभुलकर 

नागपूर : लोकांपर्यंत भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल योग्य माहिती मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचावी या उद्देशाने 'भीमा कोरेगाव' नाटकाचे आयोजन सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ सोशल अॅण्ड कल्चरल अॅकॅडमी, नागपूर यांच्या वतीने येत्या ८ आणि ९ एप्रिलला दीक्षाभूमी परिसरात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सुरू होणारा हा नाटक महोत्सव  धम्मदानाच्या  उद्देशाने आयोजित करण्यात आलेला आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती या नाटकातील कलावंत अशोक जांभुळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
   ७००० वर्ग फुटाच्या रंगमंचावर होणाऱ्या या नाटकामध्ये मुंबई आणि नागपूर येथील १५० कलाकार तसेच तोफा आणि घोडे यात सहभागी असतील. तसेच नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित ५.१ साऊंडची व्यवस्था या निमित्ताने करण्यात आलेली आहे. या भव्य रंगमंचावर बॉलीवुड सिंगर खुशबू जैन, दिनेश अर्जुना यांच्यासह दिग्दर्शक आणि लेखक कबीर दा भीमा कोरेगावचा इतिहास नागरिकांपुढे मांडतील. राजगिरी संस्थेतर्फे निर्मित या नाटकाचे मुख्य निर्माता धीरज कुमार मेश्राम आणि कार्यकारी निर्माता सम्राट गोटेकर आहेत. तर इंस्टीट्यूट ऑफ सोशल अॅण्ड कल्चरल अकॅडेमीतर्फे आयोजित या नाटकात प्रेरणा धाबर्डे, जोधा अकबर फेम अशोक देवलिया, संयोनी मिश्रा, सुवर्णा नलोडे, गौतम ढेंगरे, रवी पाटील, प्रशांत गाडगे, सुनील हिरेखन, मिलिंद रामटेके, चंद्रकांत साळुंके, काजल रंगारी या मुख्य कलावंतासह इतर कलावंतांच्या यात भूमिका आहेत. या नाटकाच्या आयोजनात मराठा सेवा संघ आणि त्याचे प्रमुख चंद्रकांत साळुंके यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Bhima Koregaon' play rehearsal on 8th and 9th April

Nagpur : With the aim of conveying proper information about the history of Bhima Koregaon to the people of through entertainment, the play 'Bhima Koregaon' has been organized by the Central Institute of Social and Cultural Academy, Nagpur on the 8th and 9th of April at Dikshabhumi area. This drama festival, which starts from 6 pm, is organized for the purpose of Dhammadana. Ashok Jambhulkar, the actor of this play, informed in the press conference that the funds received through this play will be handed over for the bright future of the differently-abled students.

150 actors from Mumbai and Nagpur along with guns and horses will participate in the play on a 7000 square feet stage. Also 5.1 sound arrangement based on new technology has been made on this occasion. Bollywood singer Khushbu Jain, Dinesh Arjuna along with director and writer Kabir Da Bhima will present the history of Koregaon to the citizens on this grand stage. Produced by Rajgiri Sanstha, the main producer of this drama is Dheeraj Kumar Meshram and the executive producer is Samrat Gotekar. In this play organized by the Institute of Social and Cultural Academy, Prerna Dhabarde, Jodha Akbar fame Ashok Devalia, Sanyoni Mishra, Suvarna Nalode, Gautam Dhengre, Ravi Patil, Prashant Gadge, Sunil Hirekhan, Milind Ramteke, Chandrakant Salunke, Kajal Rangari and other artists in this play. It has roles. It was also informed that Maratha Seva Sangh and its head Chandrakant Salunke have also received special support in organizing this play.

No comments