Breaking News

बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण | N7 News voice

नागपूर जिल्हा वकील संघटनेचा उपक्रम


वकिलांना सन्मानित करतांना मान्यवर

नागपूर : आकाशवाणी चौक येथील नागपूर जिल्हा वकील बार असोसिएशन संघटनेतर्फे  बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्या वकिलांना बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  
      यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर वकील संघाचे अध्यक्ष व सर्व वकिलांचे लाडके, ऍड.कमल सतुजा, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता  भांडारकर, मुंबई गोवा बार कौन्सिलचे ज्येष्ठ अधिवक्ता गोवर दीपे , वरिष्ठ अधिवक्ता रोशन बागडे, वरिष्ठ अधिवक्ता योगेश सोनी, ज्येष्ठ वकील गायकवाड, नागपूर जिल्हा संघटनेचे सचिव नितीन देशमुख यांच्याहस्ते विजेत्या वकिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  
     देशातील वकिली पेशा असा आहे की, न्यायाचाच विचार करावा लागतो, वकिलांचे आयुष्य हे बुद्धीच्या बळावर असते, अनेकांचे जीवन वकिलांनी बुद्धिच्या बळावर आनंदमय केले. हीच बाब लक्षात घेता   
महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्हा वकील बार असोसिएशनच्या संघटनेत बुद्धिबळ स्पर्धेचा खेळ आयोजित करण्यात आला होता,  या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील ८० वकिलांनी सहभाग घेतला.  राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यात वकील बार असोसिएशनतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन होत नाहीत. प्रथमच महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्हा वकील संघाने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवण्याचे काम केले आहे, असे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हा अति.सरकारी वकील ऍड. विलास राऊत यांनी सांगितले. 

बुद्धिबळ स्पर्धेत  प्रथम विजेत्याला ११ हजार, द्वितीय विजेत्याला ७ हजार, तृतीय विजेत्याला ५ हजारांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सहभागी  विजेत्यांना वकिली व्यवसायासोबतच समाजात चांगले काम करणाऱ्या वकिलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
      कार्यक्रम यशस्वीकरीत ऍड. श्रीरंग , ऍड. रोशन बागडे, ऍड. विलास राऊत यांनी परिश्रम घेतले. यावेळी विशेष पाहुणे म्हणून तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार,  एम.ए.जब्बार, संस्थेचे सहकारी रवींद्र तांडेकर, सहयोगी दीपचंद शेंडे  उपस्थित होते.

Prize distribution ceremony of chess tournament 

Participating winners were felicitated with awards for lawyers

An initiative of Nagpur District Lawyers Association

Nagpur : The prize distribution ceremony to the winning lawyers of the chess competition by the Nagpur District Lawyers Bar Association at Akashvani Chowk was concluded with great enthusiasm.
      On this occasion, the chief guests of the program were President of Nagpur Vakil Sangha and beloved of all lawyers, Adv. Kamal Satuja, Senior Advocate Bhandarkar of High Court, Senior Advocate Gowar Deepe of Mumbai Goa Bar Council, Senior Advocate Roshan Bagde, Senior Advocate Yogesh Soni, Senior Advocate Gaikwad, Nagpur District Association. Secretary Nitin Deshmukh awarded the award to the winning lawyers.
     The legal profession in the country is such that one has to think about justice, the life of lawyers is based on the power of intellect, the lives of many have been made happy by the power of intellect. Considering the same thing
A game of chess competition was organized in the association of Nagpur District Lawyers Bar Association of Maharashtra State, in which 80 lawyers of Nagpur district participated. No chess tournament is organized by Lawyers Bar Association in any district of the state. For the first time, the Nagpur District Lawyers Association of Maharashtra State has worked to register its name in the pages of history. Vilas Raut said.

In the chess competition, the first winner was awarded 11 thousand, the second winner 7 thousand, the third winner 5 thousand in cash and a medal. Participating winners were felicitated with awards for lawyers who have done good work in the society in addition to the legal profession,
      Program successfully add. Srirang, Adv. Roshan Bagde, Adv. Vilas Raut worked hard. Tejas Institute President Chandrasekhar Argulewar, M.A. Jabbar, Institute Fellow Ravindra Tandekar, Associate Deepchand Shende were present as special guests on this occasion.




No comments