नागपुरात अग्निवीरसाठी ५९ हजार युवकांची परीक्षा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर : 'अग्निवीर' बनण्यासाठी विदर्भातील ५९,९११ युवकांनी नोंदणी केली आहे. अग्निवीरांसाठी भरती प्रक्रिया मानकापूर स्टेडियम येथे १७ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपासून सुरू होणार असून ७ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यासाठी स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
विदर्भातील ११ जिल्ह्यातील उमेदवारांची भरती नागपुरात होत आहे. सैन्याच्या नियमानुसार रात्री १२ ते सकाळपर्यंत ही भरती चालेल. त्यामुळे वाहतुकीचा त्रास होणार नाही. भरतीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. उमेदवारांना मानकापूर स्टेडियमवर ये-जा करता यावी, यासाठी शासकीय शुल्कासह बस सेवेचीही सुविधा उपलब्ध राहील. वैद्यकीय सुविधासुद्धा सह उत्तीर्ण उमेदवारांसाठी भोजनाचीही सुविधा राहील. उमेदवारांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे कुणी आमीष दाखवित असेल तर अशांपासून सावध राहा, त्याची तक्रार करा, तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, असेही जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.
विदर्भातील भरती कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे...
१) १७ व १८ सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील अग्निवीरांची भरती होईल.
२) १९ सप्टेंबरला गडचिरोली व वर्धा,
३) २० सप्टेंबर चंद्रपूर
४) २१ सप्टेंबर यवतमाळ,
५) २२ सप्टेंबर भंडारा,
६) २३ सप्टेंबर अकोला ( अकोला तालुका सोडून सर्व तालुके)
७) २४ सप्टेंबर अमरावती (अमरावती, दर्यापूर सोडून सर्व तालुके),
८) २६ सप्टेंबर अकोला व अमरावती,
९) २७ सप्टेंबर वाशीम,
१०)२८ सप्टेंबर नागपूर (नागपूर शहर व तालुका सोडून सर्व तालुके),
११) २९ वाशिम-नागपूर,
१२) ३० सप्टेंबर (सर्व जिल्हे),
१३) १ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती सोडून सर्व जिल्हे,
१४) ३ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती,
१५) ४ ऑक्टोबर सर्व जिल्हे
१६) ५ ते ७ ऑक्टोबर वैद्यकीय चाचणी होईल.
Examination of 59 thousand youths for fire fighters in Nagpur: Collector Dr. Vipin Itankar
Recruitment process on September 17: Mankapur Stadium ready
Nagpur: 59,911 youth of Vidarbha have registered to become 'Agniveer'. The recruitment process for Agniveer will start at Mankapur Stadium on 17th September from 12 pm and will continue till 7th October. Collector informed that all facilities are available at the stadium. Dr.Vipin Itankar said in a press conference on Monday.
Recruitment of candidates from 11 districts of Vidarbha is taking place in Nagpur. According to army rules, this recruitment will be conducted from 12 midnight to morning. So there will be no traffic problem. The entire administration is ready for recruitment. For the candidates to be able to come and go to Mankapur Stadium, the facility of bus service will be available along with the government fee. Along with medical facilities, there will also be food facilities for the passed candidates. Collector Itankar also said that if anyone lures the candidates to get a job in the army, beware of such, report it, a case will be registered immediately.
Recruitment program in Vidarbha is as follows…
1) On 17th and 18th of September firemen will be recruited in Gondia district.
2) Gadchiroli and Wardha on September 19,
3) 20 September Chandrapur
4) 21 September Yavatmal,
5) 22 September Bhandara,
6) 23rd September Akola (All talukas except Akola taluka)
7) September 24 Amravati (All talukas except Amravati, Daryapur),
8) 26 September Akola and Amravati,
9) September 27 Washim,
10) 28 September Nagpur (All talukas except Nagpur city and talukas),
11) 29 Washim-Nagpur,
12) September 30 (All Districts),
13) 1 October All districts except Nagpur, Akola and Amravati,
14) October 3 Nagpur, Akola and Amravati,
15) 4th October All Districts
16) Medical test will be conducted from 5th to 7th October.
![]() |
Dr.Vipin Itankar , Nagpur collecter |
No comments