ब्लू स्टार कॉन्व्हेंटमध्ये जे. सी आयतर्फे गुरुपौर्णिमा साजरी
![]() |
पाचपावली : ब्लु स्टार काॅन्व्हेन्टच्या शिक्षकांसोबत जे.सी.आयचे पदाधिकारी |
नागपूर, ता. १४ : पाचपावली येथील ब्लु स्टार काॅन्व्हेन्टमध्ये जे. सी आय जूनियर चेंबर इंटरनेशनल नागपुर रिजोल्यूट्सतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जे. सि आय नागपुर रिज्योल्युट्सच्या अधक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल धोपटे भुते, जे सि आय नागपुर रिजोल्युट्सचे संचालक राज भुते, जे सी आय नागपुर रिजोल्यूटसचे सचिव मिथलेश जिंदल, शाळेच्या पर्यवेक्षिका उषा जेम्स, वंदना मेश्राम, संगिता लखपती, शिवानी वर्मा उपस्थित होत्या.
गुरुवर्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोबतच अतिथींचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले.गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या हातून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी गुरुची महिमा सांगताना भगवान श्रीराम यांचे सुद्धा विश्वमित्र वशिष्ठ हे महान गुरु होते याचे उदाहरण दिले गुरु शिवाय आपण घडू शकत नाही हे त्यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापिका स्नेहल भुते यांनी मुलांना मार्गदर्शन करून विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते हे किती मोलाचे आहे स्पष्ट करून सांगितले. राज भुते यांनी मुलांचे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा मेश्राम व आभार प्रदर्शन श्रीमती रसिका मस्नेवार.यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments