Breaking News

संघाराजाची धम्मदेसना ऐकण्यासाठी बौद्ध अनुयायांची अलोट गर्दी


दीक्षाभूमीवरील सभागृह बौद्ध अनुयायांच्या गर्दीने क्षमतेपेक्षा दुप्पटीने फुल्ल
नागपूर,ता.३ : बांग्लादेश येथील सर्वोच्च भिक्खु संघाचे तेरावे संघराजा प.पू. डॉ. ज्ञानश्री (98 वर्षीय) हे शनिवार दुपारी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थि दर्शनासाठी दीक्षाभूमीवर आले होते. यावेळी भारताच्या पूर्वेकडील राज्यातील व पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशातील जवळपास 20. भिक्षूंचा ताफा त्यांच्या सोबतीला होता. दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारातून सरळ दीक्षाभूमी स्तूपाजवळ त्याची गाडी येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य मा. विलास गजघाटे व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या बी. ए मेहरे आणि त्यांच्या चमुने संघराजा डॉ. ज्ञानश्री यांचे उत्साहात स्वागत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिसमोर संघराजा नतमस्तक 

स्तूपाच्या आतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थि दर्शनासाठी आलेल्या संघराजा आणि त्यांचा भिक्खु संघ यांनी अस्थिंचे दर्शन घेवून त्यापुढे नतमस्तक झाले त्यानंतर दीक्षाभूमीचे मा विलास गजघाटे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी संघराजास संघदान दिले. यानंतर संघराजाने त्रिशरण पंचशिल घेवून पुढील कार्यक्रमासाठी दीक्षाभूमीवरील दादासाहेब कुंभारे सभागृहात पदार्पण केले. सभागृहात सभागृहाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीने सभागृह तुडूंब भरला होता. बौद्ध अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेकांना सभागृहाबाहेरच उभे राहून समाधान मानावे लागले. सभागृहातील धम्मदेसनेचा कार्यक्रम बौद्ध अनुशासनानुसार विधीवतपणे सुरु झाला यावेळी विदर्भ इन्स्टिटयूट ऑफ बुद्धिस्ट अॅन्ड ओरिएंटल रिसर्च, नागपूर व महिला सशक्तिकरण संघ, नागपूर यांच्या वतीने संघराजा डॉ ज्ञानश्री यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सदर संघटनांच्या वतीने मानपत्र व दीक्षाभूमीचे सुंदर तैलचित्र त्यांना बहाल करण्यात आले. संघराजांना देण्यात आलेले मानपत्र पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, नागपूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सुदेश भोवते यांनी उपस्थितांच्या पुढे वाचन केले. यानंतर पुज्य भंते खेमाथेरा (त्रिपुरा) यांनी संघराजा डॉ.ज्ञानश्री यांचे संक्षिप्त जीवनचरित्र उपस्थितांपुढे वाचुन दाखविले. कार्यक्रमाच्या मुख्य भागात संघराजा डॉ. ज्ञानश्री यांनी धम्मदेसना दिली. धम्मदेसनेचे प्रवचन जवळपास 45 मिनीट चालले 98 वर्षिय प.पु.भदन्त डॉ. ज्ञानश्री यांना प्रत्यक्ष कणखर आवाजात बोलतांना पाहुन सभागृहात उपस्थित संपूर्ण बौद्ध अनुयायी अत्यंत हर्षित झाले. यावेळी संघराजाने धम्मदेशना देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, कर्तुत्व आणि जीवन भारतीय बौद्धांनी लक्षात घेवून धम्मकार्याची चळवळ पुढे नेली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले त्याच प्रमाणे पंचशिलास आचरणात आणून बौद्ध अनुयायांनी जीवन जगले तर पुढील आयुष्य सुखात जाणार असे ते यावेळी बोलले. त्यांच्या संपूर्ण धम्मदेसनेचा विषय बौद्ध धम्माची आचारसंहिता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक जगाच्या इतिहासात भारतात केलेली धम्मक्रांती हाथ होता. यावेळी ते असेही बोलले कि, दीक्षाभूमीला भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थि दर्शनामुळे माझे जीवन सफल झाले असे मी मानतो. संघराजाची धम्मदेशना संपताच सभागृहातील बौद्ध अनुयायांनी संघदानासाठी स्टेज आणि स्टेजच्या आजुबाजुला एकच गर्दी केली. कार्यक्रमाच्या शेवटी समापन गाथेनंतर संघराजाला रविभवन येथील त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी गर्दीतून मार्ग काढीत त्यांचा मार्ग मोकळा करावा लागला. या संपूर्ण मंगलप्रसंग घडवून आणण्यासाठी प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे मा. विलास गजघाटे व यांची चमु, पवन शेलारे, दीक्षित आवळे, महिला सशक्तिकरण संघाचे संपूर्ण स.महाविद्यालयातील डॉ. सिद्धार्थ वाणी, डॉ. सुदेश भोवते, डॉ. चंद्रशेखर पाटील, कार्यकर्ते, पी.डब्ल्यू.एस. म डॉ. नागसेन लांडगे व विवॉर्न चे अश्ववीर गजभिये, प्रेमकुमार उके, ज्योतीराव बारसागडे, डॉ. नितीन मेश्राम, डॉ. मनोहर कुंभार, डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे भन्ते ज्योती बोधी, मन्ते सुमेध, भन्ते डॉ. चंद्रकिर्ती, प्राचार्य पुरण लोणारे, मिलींद फुलझेले, प्रकाश रंगारी इत्यादींनी परिश्रम घेतले. 

 A large crowd of Buddhist followers to listen to the Dhammadesana of Sangharaja Natmastak Sangharaja in front of the remains of Dr. Babasaheb Ambedkar. The thirteenth Sangharaja of the highest Bhikkhu Sangh in Bangladesh, HH Dr. Gyanshree (98 years old) on the afternoon of July 2, 2022, Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar had come to the initiation ground to see the sacred bones. He was accompanied by a group of about 20 monks from the eastern states of India and from West Bengal and Bangladesh. As soon as his car approached the Deekshabhoomi Stupa directly from the main entrance of Deekshabhoomi, Member of Dr.Babasaheb Ambedkar Memorial Committee Hon. Vilas Gajghate and Principal of Dr.Ambedkar College B.Sc. Dr. A. Mehre and his cousin Sangharaja. Dnyanashree was enthusiastically welcomed. Inside the stupa, The Sangharaja and his Bhikkhu Sangh, who had come to pay homage to the sacred bones of Dr. Babasaheb Ambedkar, paid obeisance to the bones and then bowed down to them. After this, Sangharaja took Trisharan Panchshil and made his debut at Dadasaheb Kumbhare Hall on Deekshabhoomi for the next program. Tomorrow The auditorium was overcrowded. Due to the large number of Buddhist followers, many had to stand outside the synagogue to be satisfied. The Dhammadesana program was formally inaugurated in accordance with the Buddhist discipline. On behalf of Vidarbha Institute of Buddhist and Oriental Research, Nagpur and Women's Empowerment Association, Nagpur, Sangharaja Dr. Gyanshree was warmly welcomed. On this occasion, on behalf of these organizations, a certificate and a beautiful oil painting of Deekshabhoomi were presented to him. Honors conferred on Sangharajas by PWS. Dr. Sudesh Bhowate, Head, Department of English, College, Nagpur, read out in front of the audience. After this, Pujya Bhante Khemathera (Tripura) read out a brief biography of Sangharaja Dr. Gyanshree in front of the audience. In the main part of the program, Dr. Sangharaja. Dnyanashree gave Dhammadesana. Dhammadesne's discourse lasted for about 45 minutes. All the Buddhist followers present in the hall were very happy to see Dnyanashree speaking in a strong voice. He also appealed to the Indian Buddhists to take the Dhammakarya movement forward considering the work, deeds and life of Dr. Babasaheb Ambedkar while giving Dhammadeshana. The subject of his entire Dhammadesana is the code of ethics of the Buddhist Dhamma and Dr. Babasaheb Ambedkar's Dhammakranti in India was a hand in the history of the modern world. He also said that after visiting Deekshabhoomi,  I believe that my life was successful because of Dr.Babasaheb Ambedkar's vision of the sacred bones. As soon as Sangharaja's Dhammadeshana was over, the Buddhist followers in the hall gathered in a single crowd on and around the stage for Sanghadana. At the end of the program, Sangharaja had to clear his way through the crowd to reach his residence at Ravi Bhavana. To bring about this whole auspicious occasion, HH Dr. Babasaheb Ambedkar Memorial Committee Hon. Vilas Gajghate and his team, Pawan Shelare, Dixit Awale, Dr. Siddharth Vani, Dr. Around Sudesh, Dr. Chandrasekhar Patil, activists, PWS I am Dr. Nagsen Landage and Ashwin Gajbhiye of Vivorn, Premkumar Uke, Jyotirao Barsagade, Dr. Nitin Meshram, Dr. Manohar Kumbhar, Dr. Priyadarshi Khobragade is called Jyoti Bodhi, Mante Sumedh is called Dr. Chandrakirti, Principal Puran Lonare, Milind Fulzele, Prakash Rangari etc. worked hard.

No comments