Breaking News

राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

मुंबई : - कोरोना चा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनते पर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

 पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब ;मध्य प्रदेश; पश्चिम बंगाल; ओरिसा; बिहार या राज्यांनी दिला आहे.महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे.ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे.महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये ही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकार ने केलेला नाही.परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्स चा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही.ही खेदजनक बाब आहे.पत्रकारांच्या मागण्यांची  उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये.राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोना चा या बिकट काळात 124 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे.त्यांच्या कुटुंबियांना  राज्य सरकार ने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर 50 लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.

The state government should give the status of Corona Warrior to journalists - Union Minister of State Ramdas Athavale

 Mumbai :- While Corona's havoc is on the rise, journalists are reporting important information to the public, regardless of their lives. Republican National President and Union Minister of State for Social Justice Na Ramdas Athavale has sent a letter to Chief Minister Uddhav Thackeray demanding that the Maharashtra government give the status of Covid Frontline Warriors Corona Warrior to journalists who are the fourth pillar of democracy.

 Covid Frontline Warriors (Corona Warrior) status for journalists Punjab; Madhya Pradesh; West Bengal; Orissa; The states of Bihar have given. Maharashtra has a tradition of monthly journalists who have led all India. The state of Maharashtra has always been a state that respects journalists. But now the Mahavikas Aghadi government in the state seems to be neglecting journalists. These journalists were not included in the essential services during the lockdown by the Mahavikas Aghadi government. As a result, journalists and cameraman photographers cannot travel by train. While in other states, journalists are given the status of Corona Frontline Warriors, in Maharashtra, journalists are not registered in the essential service of train travel. This is a pity. In Maharashtra, 124 journalists have died due to corona. The state government should provide relief to their families. In a letter to Chief Minister Uddhav Thackeray, Na Ramdas Athavale has demanded that journalists should be given the status of Corona Warriors and given priority in vaccination.


No comments