Breaking News

आपतर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण

 

आम आदमी पक्षातर्फे रोज एक उपक्रम ;गरजूंना मदतीचा हात 

नागपूर,ता.११ : मेडिकल परिसरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने आम आदमी पक्षातर्फे मोफत जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे  नागपूर शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून कोरोना उपचारासाठी रुग्ण येतात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा असतात महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या काळात लावलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ११ वाजेपर्यंतच सुरू असतात त्यामुळे ह्या नातेवाईकांना दोन वेळच्या जेवणाची होणारी गैरव्यवस्था लक्षात घेता आप पक्षातर्फे त्यांच्या जेवणाची मोफत सेवा मेडिकल परिसरात करण्यात आली. अशा प्रकारे आम आदमी पक्षातर्फे रोज एक उपक्रम राबवून गरजूंना मदत पोहचवीत आहेत. या मोफत जेवण वाटपाच्या कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते सुरेंद्र समुद्रे, संजय अनासाने, उमाकांत बनसोडे, निखिल मेंढवाडे, संदीप कोल्हे, राजू शेंद्रे,रवी अहिरकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Free meals to the relatives of Corona patients on our behalf. 

Aam Aadmi Party is helping the needy by implementing a daily activity.


Nagpur: The Aam Aadmi Party (AAP) had organized a free meal for the relatives of Corona patients in the medical area. At the Government Medical College (Medical), patients from rural areas around Nagpur city come for corona treatment along with their relatives. Their meals were provided free of cost by the party at the medical premises. In this way, the Aam Aadmi Party is helping the needy by implementing an initiative every day. Party workers Surendra Samudra, Sanjay Anasane, Umakant Bansode, Nikhil Mendhwade, Sandeep Kolhe, Raju Shendre, Ravi Ahirkar, etc. were present in this free meal distribution program.

No comments