मनसेची गडकिल्ले संवर्धन जनजागृती रॅली
![]() |
बाईक रॅलीला मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी हिरवी झेंडी दिली |
मनसे सैनिकांतर्फे जनजागृती रॅली
नागपूर, ता. ३१ : अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्याची दुरुस्ती व योग्य काळजी सरकार घेत नसल्याने मनसे सैनिकांमध्ये नाराजी असून शासनाने या संदर्भात योग्य भूमिका घ्यावी यासाठी महाराष्ट्रातील मनसे सैनिकांतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आली.
यावेळी नागपुरातील चार मनसे सैनिक आकाश साळवे,लोकेश कामडी,देवश्री गायधने,अंकित कोथळे यांनी पुढील पंधरा दिवस बाईक रैलीद्वारे प्रवास गडकिल्ल्यांना भेट देणार असून ह्या गडकिल्यांची सरकार तसेच पुरातत्व विभागाने चांगली जोपासना करावी याचा प्रसार प्रचार करणार आहे.बाईक रॅलीला मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी हिरवी झेंडी दिली.शहराध्यक्ष विशाल बडगे,जिल्हाध्यक्ष सतिश कोल्हे,शहर सचिव घनश्याम निखाडे,विभागद्यक्ष उमेश उत्तरखेडे,शशांक गिरडे,विभाग सचिव निमिष पाटणकर,अमोल राऊत उपस्थित होते.
MNS Gadkille Conservation Awareness Rally
Nagpur: The MNS soldiers in Maharashtra have organized an awareness rally to demand that the government take appropriate action in this regard as the government is not taking proper care and repair of the fort sanctified by Chhatrapati Shivaji Maharaj.
Four MNS soldiers from Nagpur Akash Salve, Lokesh Kamadi, Devashri Gaidhane and Ankit Kothale will visit Gadkil for the next fortnight by bike rally. City President Vishal Badge, District President Satish Kolhe, City Secretary Ghanshyam Nikhade, Divisional President Umesh Uttarkhede, Shashank Girde, Divisional Secretary Nimish Patankar, Amol Raut were present.
मनसेची गडकिल्ले संवर्धन जनजागृती रॅली
Reviewed by Nilesh Raut : N7 News Voice
on
March 31, 2021
Rating: 5

No comments