Breaking News

नागपूरात कोविड लसिकरण जनजागृती मोहिमेला गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या 
अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम

 कोविड-१९ लसिकरण, आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेला  हिरवी झंडी दाखवतांना  केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी

नागपूर, : कोविड-१९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, जहाजबांधणी मंत्रालयचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.  

            याप्रसंगी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक संचालक निखील देशमुख, पत्र सुचना कार्यालयाचे सहायक संचालक शशीन राय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्यने  या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-१९ लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.   
          या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-१९ विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे. 
       यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी विभागीय आयुक्तर कार्यालय, नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे. 
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक संचालक निखील देशमुख, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक संजय तिवारी,संजीवनी निमखेडकर, जी. नरेश आणि रंगधून कलामंच  सदस्य व पदाधिकारी यांनी  परिश्रम घेतले.




Nitin Gadkari launches Kovid vaccination, self-reliant India awareness campaign in Nagpur

Nagpur: Nitin Gadkari, Minister for Road Transport and Highways and Minister for Micro, Small and Medium Enterprises, Shipbuilding, inaugurated the mobile exhibition on multimedia mobile vans prepared for public awareness in various talukas of the district on the subject of Kovid-19 vaccination and self-reliant India. Was performed at the residence.

Nikhil Deshmukh, Assistant Director, Regional Public Relations Bureau, Pune, Shashin Rai, Assistant Director, Letter Information Office, Hansraj Raut, Regional Publicity Officer, Regional Public Relations Bureau, Kolhapur Division, Praveen Take, District Information Officer, Anil Gadekar, Media Coordinating Officer were present on the occasion.

In collaboration with Regional Public Relations Bureau of the Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau of Pune, Nagpur, World Health Organization, UNICEF and Department of Health, Maharashtra, under this initiative, 16 vans traveling in 36 districts of Maharashtra through multimedia exhibitions and Kovid-19 vaccination campaign And awareness is being created about the Self-Reliant India Campaign. As a part of this, the campaign is being implemented by the Regional Public Relations Bureau, Nagpur through a 10-day multi-media exhibition in villages in various talukas of Nagpur district.


 Under this initiative, the previous objective is to provide information about vaccination, various activities under Self-Reliant India and rules regarding COVID-19 to the citizens of the district. Awareness about the misconceptions and rumors about vaccination, the government's efforts to build a self-reliant India will be made known to the people through a mobile media exhibition.
       Awareness message will be conveyed to the people by presenting the program through the artists of the art troupe. The Divisional Commissioner's Office, Nagpur, District Collector's Office, District Health Department and District Information Office have been involved in the awareness campaign in the district. For the success of this campaign under the guidance of Regional Public Relations Bureau, Pune Director Prakash Makdum, Regional Public Relations Bureau, Pune Assistant Director Nikhil Deshmukh, Regional Public Relations Bureau, Kolhapur Regional Publicity Officer Hansraj Raut, Regional Publicity Assistant Sanjay Tiwari, Sanjeevani Nimkhedkar, G. Naresh and Rangdhun Kalamanch members and office bearers worked hard.

No comments