जिम सुरु करा, फिटनेस असोसिएशनतर्फे राज्यपालांकडे मागणी
मुंबई : मिशन बिगिन अगेन नुसार महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना, रेस्टॉरंट्स अंतिम टप्प्यात उघडले गेले आहेत. फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशन व भाजपतर्फे व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी करण्यात आली.
मोठ्याप्रमाणावर फिटनेस प्रोफेशनल्स आणि ट्रेनर्स हे मध्यमवर्गीय असून लॉकडाऊनमध्ये जिम बंद असल्याकारणाने त्यांनादेखील आर्थिक अडचणीला सामोर जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे जिम मालकही तोट्यात असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे काही जिम मालकांना जिम्स बंद कराव्या लगल्या आहेत तर काहींनी जिममधील फिटनेस एक्सपर्ट्स आणि प्रशिक्षकांना नोकरीवरुन कमी केले आहे. फिटनेस प्रोफेशनल्स, व्यायामशाळा मालक आणि संटघना यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भेडसावत असलेल्या समस्यांची मांडणी राज्यपालांसमोर केली.
राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करतांना भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी, फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशनचे पदाधिकारी
मिशन बिगिन अगेन नुसार महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना, रेस्टॉरंट्स अंतिम टप्प्यात उघडले गेले आहेत. तर दुसरीकडे जिम मालक आणि फिटनेस प्रोफेशनल्स जिम सुरु करण्याच्या चर्चेसाठी अजूनही वाट पाहत असून सरकार त्यांच्याकडे डोळेझाक करीत आहे.
फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश भारते, एमडी स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉ. अतीब शेख, क्रिस गेथिन जिमचे ललित धर्मानी, जेएमके फिटनेसचे रितेश शाह, नायट्रो फिटनेसचे प्रबोध डावखरे, कोर फिटनेसचे राजेंद्र कुमार, वन अबाउ फिटनेसचे विश्वास शिंदे, अबू बकर बॉम्बे फिटनेसचे खान, एज फिटनेसचे विराज करिया, जेव्हलिन फिटनेसचे प्रवीण पांडव आणि फिटनेस एम्पायरचे संदीप गोळे यांनी राज्यापालांना पुष्पगुच्छ प्रदान करुन त्यांच्याकडे आदेशपत्राची विनंती केली. आरोग्या प्रति जागरूक असलेले लोक म्हणजे फिटनेस प्रोफेशनल्स सोशल डिस्टेसिंगचे नियम पाळून त्यांचे काम उत्तमप्रकारे सांभाळू शकतात. त्याचप्रमाणे व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोविड-१९ विरुद्ध लढण्यास मदतच होईल. हा अनेक जणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असूनदेखील राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. मा. राज्यपालांनी उपस्थित जिम मालकांच्या समस्या गांभीर्याने ऐकल्या आणि त्याची विनंती विचारात घेण्याचे आश्वासन दिले.
श्वेता शालिनी,प्रवक्त्या भाजपा
गेल्या ६ महिन्यांपासून आर्थिक उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्या कारणाने फिटनेस व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर नोकरदारवर्गाप्रमाणे आम्हाला वर्क फ्रॉम होम अथवा ऑनलाइन पर्याय उपयुक्त नाही तसेच कोविडच्या भीतीने लोकं आम्हाला भेटण्यासही घाबरत आहेत. सदर समस्यांबाबत आम्ही राज्यपालांना सांगितले असून जिम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.
शैलेश भारते,अध्यक्ष फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशन
BJP Spokesperson Shweta Shalini meets Governor. Takes up the cause of Fitness Professionals and Gym Owners.
Mumbai : BJP Spokesperson Shweta Shalini met the Governor of Maharashtra His Excellency Shri Bhagat Singh Koshiyari Ji today requesting for intervention in restarting the gyms. She was accompanied by leading fitness professionals, gym owners and association who explained the dire situation which professionals and owners find themselves in. A large number of professionals and trainers are middle class citizens who saw their income drain as lockdown compelled complete closure. Gym owners explained how they are bleeding financially due to closure forcing many of them to abandon the business and leaving trainers and health experts unemployed.
As Maharashtra unlocks in phases as per the Mission Begin Again, Restaurants have opened in what appears to be the final phases. Gym Owners and Fitness Professionals on the other hand are struggling to make ends meet and Government is turning a blind eye to their plight.
Shailesh Bharate of Fitness Professionals Association, Dr. Ateeb Shaikh, MD Sports Medicine, Lalit Dharmani of Kris Gethin Gyms, Ritesh Shah of JMK Fitness, Prabodh Davkhare of Nitro Fitness, Rajendra Kumar of Core Fitness, Vishwas Shinde- One Above Fitness, Abu Bakr Khan of Bombay Fitness, Viraj Karia of Edge Fitness, Pravin Pandav of Javelin Fitness and Sandeep Gole of Fitness Empire formed part of the delegation handing over the bouquet and request letters to the Honorable Governor.
Shweta Shalini after meeting the Governor stated that " Fitness professionals being health conscious people can be relied upon to follow the social distancing protocols strictly. Moreover, exercise will only positively impact the fight against Covid-19 by boosting the immunity. The State Government isn't just responding to the fact that so many livelihoods are at stake. The Honorable Governor did a sympathetic listening to the concerns of Gym owners and has taken our request for consideration
Shailesh Bharate, President of Fitness Professionals stated "It's been 6 months Fitness professionals have lost livelihood without any other source of income. Unlike other professions, Work-from-Home or Online medium isn't a practical solution and people are hesitant to call us due to the risk of pandemic. We have conveyed the same to Governor and requested for reopening of Gyms
No comments