Breaking News

हाथरसविरोधात भीम शक्तीचा आक्रोश : अनिल मेश्राम



नागपूर : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे वाल्मीकी समाजाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित कुटुंबासोबत तेथील शासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात  भीम शक्तीच्या  वतीने  विदर्भ महासचिव अनिल मेश्राम  यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

    दलित समाजाच्या तरुणीवर सवर्ण समाजाच्या तरुणांकडून अमानुषपणे अत्याचार होतो, तिला मरणयातना दिल्या जातात, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात आणि यानंतरही तेथील जातीवादी सरकारच्या नियंत्रणाखाली पोलीस प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालून पीडित कुटुंबावरच अन्याय केला. मुलीच्या पार्थिवाची विटंबना केल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आंदोलना दरम्यान मागणी करण्यात आली. घटनेच्या निषेर्धात उपजिल्हाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.


          यावेळी भीम शक्तीचे महाराष्ट्र प्रभारी  रामराव गाडेकर ,विदर्भमहासचिव  अनिल मेश्राम ,शहर अध्यक्ष बाबा बनसोड, जिल्हा अध्यक्ष कैलास बोरकर,  उपाध्यक्ष नागपूर शहर आटो संघटनेचे अब्दुल रफिक , सहसचिव  देवाजी कांबळे,  संपर्क प्रमुख डॉ. चिंतामणी लक्षणे, सुनंदा शेंडे  पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Bhima Shakti's outcry against Hathras

Nagpur: Bhim Shakti led by Vidarbha General Secretary Anil Meshram staged an agitation at Sanvidhan Chowk in Hathras, Uttar Pradesh against the incident of mass atrocities on a young woman of Valmiki community and the unconstitutional and inhumane act of the government with the victim's family.

    The Dalit girl was inhumanely tortured by the youth of the upper caste, tortured to death, and even after this the police administration under the control of the casteist government backed the accused and did injustice to the victim's family. The agitation demanded immediate dismissal of the Uttar Pradesh government and imposition of presidential rule, alleging desecration of the girl's body. A statement was issued to the Deputy Collector in protest of the incident.
          Bhim Shakti's Maharashtra in-charge Ramrao Gadekar, Vidarbha general secretary Anil Meshram, city president Baba Bansod, district president Kailas Borkar, vice president Nagpur city auto association Abdul Rafiq, joint secretary Devaji Kamble, liaison chief Dr. Chintamani Lakshne, Sunanda Shende office bearers, activists had participated in the agitation.

No comments