पांढरकवडा येथे कंगनाचा पुतळा जाळून शेतकरी विधवांनी निषेध केला
केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत दोन कायदे संसदेत पारीत केले आहे. या नविन कायद्याविरोधात शेतकरी विधवांनी आज पांढरकवडा येथे प्रचंड घोषणाबाजी करत आपला सरकार विरोधी संताप व्यक्त करून सिने अभिनेत्री कंगना राणावतने शेतकरी नेत्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे पुतळा जाळण्यात आला.
पांढरकवडा : केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत दोन कायदे संसदेत पारीत केले आहे. या नविन कायद्याविरोधात शेतकरी विधवांनी आज पांढरकवडा येथे प्रचंड घोषणाबाजी करीत आपला सरकार विरोधी संताप व्यक्त केला. दरम्यान ही दोन्ही विधेयक परत न घेतल्यास दिनांक २५ सप्टेंबर पासून विदर्भात तिव्र आंदोलन सुरु करण्याचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे सिने अभिनेत्री कंगना राणावत ने शेतकरी नेत्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे पुतळा जाळण्यात आला.
केन्द्र सरकारने पारीत केलेल्या या कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शेतक-यांची प्रचंड लुट होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. शेतकरी विधवा संघटनेच्या अपर्णा मालीकर, भारती पवार, सुनीता पेंदोर, रेखा गुरुनुले, सरस्वती अम्बरवार यांच्या नेतृत्वात आज या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विधेयक मागे न घेतल्यास संपुर्ण विदर्भात आंदोलन करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली. शेतकरी विधवा भारती पवार यांनी केन्द्र सरकारच्या नविन कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी तसेच सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने शेतकरी नेत्यांना आतंकवादी संबोधल्यामुळे तिचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे सांगीतले. या आंदोलनात मोठया प्रमाणात शेतकरी विधवा सहभागी झाल्या होत्या.
कंगनाचा पुतळा जाळला
सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच शेतकरी नेत्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी नेत्यांना आतंकवादी संबोधले असा शेतकरी विधवांनी आरोप केला आहे. दरम्यान आज पांढरकवडा येथे कंगना राणावत चा पुतळा जाळून शेतकरी विधवांनी तिचा निषेध केला. यावेळी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तसेच कंगना राणावत च्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
Farmer widows protested by burning Kangana's statue at Pandharkavada
The central government has passed two laws related to the agricultural sector in Parliament. Farmer widows today chanted anti-government slogans in Pandharkavada against the new law. Meanwhile, farmer leader Kishor Tiwari has warned to start agitation in Vidarbha from September 25 if both the bills are not withdrawn. The statue was set on fire after actress Kangana Ranaut made insulting remarks against the farmers' leaders.
There is a huge outcry across the country against these laws passed by the central government. It is feared that farmers will be looted. The agitation was led by Aparna Malikar, Bharti Pawar, Sunita Pendor, Rekha Gurunule and Saraswati Amberwar. Kishor Tiwari announced agitation in the whole of Vidarbha if the bill is not withdrawn. Farmer widow Bharti Pawar said that she was protesting against the new agriculture law of the central government and also against Cine actress Kangana Ranaut for calling farmer leaders terrorists. A large number of farmer widows participated in this agitation.
Actress Kangana Ranaut has recently made an insulting statement against farmer leaders by burning Kangana's statue. Not only that, the farmer widows have accused the farmers leaders of being terrorists. Meanwhile, farmer widows protested against the burning of Kangana Ranawat's statue at Pandharkavada today. At this time huge announcements were made against Prime Minister Narendra Modi as well as Kangana Ranaut.
No comments