Breaking News

उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीचे  जेष्ठ विचारवंत  साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे 

मुंबई :  महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा  गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते.
        आंबेडकरी , दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे. डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना विनम्र श्रद्धांजली.

Lost great commentator, dark scholar in the field of movements

Chief Minister Uddhav Thakare senior thinker Dr. Bhau Lokhande 

Mumbai: Chief Minister Uddhav Thakare has paid homage to veteran thinker Dr. Bhau Lokhande, saying that he has lost a deep student of social, literary and cultural movements in Maharashtra.
In the condolence message, the Chief Minister says, Dr. Lokhande has made significant contributions as a scholar through his research and writings on Ambedkarite thought, Buddhist fairs. 
      He was active in the field of literature and culture through many organizations, including the Vidarbha Sahitya Sangh. The study is structured. . With the demise of Dr Lokhande, we have lost a deep student of social, literary and cultural movements in Maharashtra. Senior thinker A humble tribute to  Dr.Bhau Lokhande.

No comments