मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात; पक्षपातीपणाचे राजकारण करू नये : गौतम सोनवणे
मुंबई : इंदुमिल मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाचा नियोजित कार्यक्रम आज रद्द झाला असला तरी या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळी च्या नेत्यांना निमंत्रण न देता कार्यक्रम आयोजित कारण्याची घाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का झाली होती? असा सवाल करीत मुख्यमंत्री हे राज्यातील सर्व जनतेचे असतात त्यांनी पक्षपतीपणा करू नये असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केला आहे.
इंदुमिलस्थळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी जनते ने लढा दिला. केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून दिल्लीत संसदेवर ही रिपब्लिकन पक्षाने धडक देऊन मागणी मंजूर केली. त्यामुळे इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेत्यांना संघटनांना निमंत्रण द्यायचे होते. तसे न करता घाईत मुख्यमंत्र्यांनी एकटेच भूमीपूजन करण्याचा कार्यक्रम नियोजित केला होता का? मुख्यमंत्र्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम करावे आकसबुद्धीने रिपब्लिकन नेत्यांना टाळून रिपाइं चे महत्व कमी होणार नाहीं असे गौतम सोनवणे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकार ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदुमिल मधील पुतळ्याची उंची वाढवून त्यासाठी लागणारा जास्तीचा निधी ही उपलब्ध करून देऊन चांगले काम केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र जेंव्हा केंव्हा इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाला कार्यक्रम होईल तेंव्हा सर्वपक्षीय नेत्यांना रिपब्लिकन नेत्यांना सन्मानाने निमंत्रित करावे असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे.
The Chief Minister belongs to all ; Don't do partisan politics: Gautam Sonawane
Mumbai: Why was Chief Minister Uddhav Thackeray in a hurry to hold the ground-breaking ceremony of the statue of the great man Dr. Babasaheb Ambedkar at Indumil today without inviting the leaders of the Republican movement? Asking this question, Gautam Sonawane, the Mumbai president of the Republican Party, has accused the Chief Minister of being a partisan and should not be partisan.
The people of Ambedkar fought for an international level memorial of the great man Dr. Babasaheb Ambedkar at Indumil. The agitation was staged all over Maharashtra under the leadership of Union Minister of State Na Ramdas Athavale. Therefore, it was necessary to invite Union Minister of State Ramdas Athavale, National President of the Republican Party, to pay homage to the statue of Dr. Babasaheb Ambedkar at Indumil. All party leaders had to be invited.
All the leaders of the Ambedkarite movement wanted to invite organizations. Without doing so, did the Chief Minister plan to perform Bhumi Pujan alone in a hurry? Gautam Sonawane said that the importance of Ripai would not be diminished by deliberately avoiding Republican leaders. Congratulations to Chief Minister Uddhav Thackeray on the fact that the state government has done a good job by raising the height of the statue of the great man Dr. Babasaheb Ambedkar at Indumil and providing additional funds for it. Gautam Sonawane has appealed to be invited.
No comments