Breaking News

ओबीसींची जनगणना करा; जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या पदभरतीत आरक्षण दया : डॉ. ऍड. अंजली साळवे

 सारथी व बार्टीच्या धर्तीवरील ओबीसी साठीचे ‘महाज्योती’ सुरु होईल :  चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार 

बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देतांना डॉ. ऍड. अंजली साळवे


  ओबीसी प्रवर्गाची असलेली नविनतम लोकसंख्येची माहीती असणे गरजेचे असुन सदर ओबीसी बहुल जिल्ह्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही या प्रवर्गातुन शिक्षण घेतलेले तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे, त्यात व्यवसायिक व उच्च शिक्षण घेतलेला बेरोजगार झाला आहे, जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या पदभरतीत आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या  यांनी केली आहे. 

आठ ओबीसी बहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय तसेच वि. जा. भ. ज प्रवर्गाच्या आरक्षण निश्चितीसाठी शासनाने उपसमितीचे गठन केले असून या समितीने आठही जिल्ह्यासह राज्यभरातील ओबीसींची जनगणना करावी सोबतच जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या पदभरतीत आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या व ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा न्यायालय, विधिमंड्ळ व संसदेत पोहचविणा-या तसेच ‘पाटी लावा’ मोहिमेच्या प्रणेत्या डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी केली आहे. 

आरक्षणाबाबत सरकारद्वारे ओबीसींवर सातत्याने अन्याय होत असल्याच्या मागणीकडे लक्ष देत महाविकास आघाडीद्वारे आठ ओबीसी बहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय तसेच वि. जा. भ. ज प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी ही जिल्ह्यतील या प्रवर्गाची लोकसंख्या लक्षात घेउन निश्चित करण्या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली आहे.

      या समितीच्या कार्यकक्षेत या आठही जिल्ह्यातील ओबीसीसोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाची सध्याची जनग़णना करुन ती जाहिर करावी व सदर जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त सरळसेवा पदभरतीत गट-क व गट-ड सोबातच गट-अ व गट-ब तसेच या सर्व गटाच्या कंत्राटी तत्वावर होणा-या पदभरती बाबत सुद्धा आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्याचा अंतर्भाव असावा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री अजित पवार, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, मा. मंत्री, अन्न व नागरी पुरवठा तथा या उपसमितीचे अध्यक्ष ना.छ्गन भुजबळ आणि बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार मा. मंत्री,सामाजिक न्याय ना. धनंजय मुंडे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या आठ आदीवासी बहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय तसेच वि. जा. भ. ज प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर प्रवर्गापेक्षा कमी आहे. या बाबतीत विचार करीत या प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची नविनतम लोकसंख्या विचारात घेउन जिल्हास्तरीय सरळसेवेची गट-क व गट-ड संवर्गतील पदे भरण्यासाठी आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्याबाबत मंत्रीमंड्ळास अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाद्वारे दिनांक 12 जुन 2020 रोजी शासन निर्णय क्रमांक बी.बी.सी.2020 /प्र.क्र.153 ऐ/16-बी नुसार मा. ना. छ्गन भुजबळ मंत्री, अन्न व नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली आहे. 

गठीत उपसमितीच्या अनुषंगाने ओबीसी प्रवर्गाची असलेली नविनतम लोकसंख्येची माहीती असणे गरजेचे असुन सदर ओबीसी बहुल जिल्ह्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही या प्रवर्गातुन शिक्षण घेतलेले तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत, त्यात व्यवसायिक व उच्च शिक्षण घेतलेला बेरोजगार सुद्धा आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्थ सरळसेवा व कंत्राटी तत्वावर अनेक पद भरत्या निघत असतात. यात जास्तीतजास्त पद भरत्या कंत्राटी तत्वावर असतात, याबाबीकडे आपल्या निवेदनातुन लक्ष वेधत सदर गठीत उपसमितीच्या कार्यकक्षेत सदर जिल्ह्यातील ओबीसी सोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाची सध्याची जनग़णना करुन ती जाहिर करावी तसेच ओबीसी प्रवर्गाची सदर जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त सरळसेवा पद भरती सोबातच कंत्राटी तत्वावर होणा-या पद भरती बाबतसुद्धा आरक्षण निश्चिती संदर्भात उपाय योजना सुचविण्याचा अंतर्भाव असावा, तसेच जिल्हास्तरीय गट-क व गट-ड संवर्गतील सरळसेवेची पदे भरण्याबाबत आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी सदर गठीत उपसमितीच्या कार्यकक्षेत गट-क व गट-ड च्या सरळसेवा पद भरती सोबत कंत्राटी तत्वावर आरक्षण निश्चिती करावी तसेच  गट-अ व गट-ब पदाचाही सरळसेवा तसेच कंत्राटी तत्वावर आरक्षण निश्चिती संदर्भात उपाय योजना सुचविण्याचा अंतर्भाव असावा ही आग्रहाची मागणी डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी निवेदनात केली. 

डॉ. ऍड. अंजली साळवे यांची या बाबत तसेच सारथी व बार्टीच्या धर्तीवरील ओबीसी साठीचे ‘महाज्योती’ त्वरीत सुरु करण्याबाबत राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांचे सोबत प्रत्यक्ष चर्चा झाली असुन सदर मागणी पुढ़ील उप समीतिच्या बैठकीत ठेवण्याचे आश्वासन देत सारथी व बार्टी प्रमाणेच महाज्योती सुद्धा लवकरच सुरु होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
------------
English Translate :

Census of OBCs; Reservation kindness in recruitment of all groups at district level: Dr. Adv. Anjali Salve

  'Mahajyoti' for OBCs on the lines of Sarathi and Barti will start: Vijay Vadettiwar, Guardian Minister of Chandrapur


  It is necessary to know the latest population of OBC category. In this OBC-dominated district, even in the worst conditions, a large number of educated youth from this category are unemployed, including vocational and higher educated unemployed. Is done.

Other OBCs in eight OBC-dominated districts as well as Vs. Go. भ. The government has constituted a sub-committee to determine the reservation of category J. The committee should conduct census of OBCs in all the eight districts and also to suggest measures to ensure reservation in the recruitment of all groups at the district level. The issue of census of social workers and OBCs Dr. Adv. Performed by Anjali Salve.

Paying attention to the demand that the government is constantly doing injustice to OBCs regarding reservation, the Mahavikas Aghadi (MVD) has given support to other backward classes in eight OBC-dominated districts. Go. भ. A sub-committee has been constituted to suggest measures to fix the percentage of reservation for category J considering the population of this category in the district.

      Under the purview of this committee, along with the OBCs in these eight districts, the current census of OBCs in other districts of Maharashtra should be made public and it should be done at the district level for direct service posts under Group-A and Group-B along with Group-B and Group-B as well as all these groups on contract basis. He also demanded that the recruitment should include measures to ensure reservation. Shri Uddhavji Thackeray, Deputy Chief Minister no. Shri Ajit Pawar, Home Minister no. Anil Deshmukh, Hon. Minister, Food and Civil Supplies and Chairman of this sub-committee Na. Chhagan Bhujbal and Bahujan Development, Relief and Rehabilitation and Guardian Minister of Chandrapur Na. Shri Vijay Vadettiwar Hon. Minister, Social Justice no. In a statement sent to Dhananjay Munde.

Palghar, Dhule, Nandurbar, Nashik, Yavatmal, Gadchiroli, Raigad and Chandrapur are the eight backward districts in the state. Go. भ. The percentage of reservation in category J is less than that of other categories in the population of that category. Considering the percentage of the prevailing reservation and the latest population of the category, the Government of Maharashtra, General Administration Department on 12 June 2020 to submit a report to the Cabinet regarding the determination of reservation for filling up the posts in Group-C and Group-D category of district level direct service. As per B.C.2020 / PR.No.153A / 16-B. No. A sub-committee has been constituted under the chairmanship of Chhagan Bhujbal Minister, Food and Civil Supplies.

According to the constituted sub-committee, it is necessary to know the latest population belonging to the OBC category. Despite the extremely poor conditions in the OBC-dominated district, a large number of educated youth from this category are unemployed. At the district level, many posts are filled on direct service and contract basis under the district administration. The maximum number of posts to be filled is on contract basis. Noting this, the present census of OBCs in this district along with other districts of Maharashtra should be made public in the scope of work of this sub-committee and the recruitment of OBCs should be done on the basis of district administration. Reservation on contract basis should be included in suggesting measures regarding recruitment confirmation, as well as reservation on contract basis along with recruitment of direct service posts of group-C and group-D in the working area of ​​this sub-committee to suggest measures regarding reservation of direct service posts in district level group-C and group-D. He also demanded that Group-A and Group-B posts should be included in the direct service as well as suggestion of a plan of action to ensure reservation on contract basis. Adv. Anjali Salve made the statement.

Dr. Adv. In this regard, Anjali Salve also asked the state's Bahujan Vikas, Relief and Rehabilitation Minister and Chandrapur's Guardian Minister Na. He had a direct discussion with Mr. Vijay Vadettiwar and promised to put the demand in the next sub-committee meeting. He informed that Mahajyoti like Sarathi and Barti will also start soon.

Photo Line - Bahujan Development, Relief and Rehabilitation and Chandrapur's Guardian Minister no. While giving a statement to Shri Vijay Vadettiwar, Dr. Adv. Anjali Salve
-------------------

No comments