Breaking News

रक्षाबंधनाच्या पर्वावर आशा वर्करला सन्मानित करणार : ना. विजय वडेट्टीवार


 


गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. अश्या 
 रक्षाबंधनाच्या पर्वावर आशा वर्करला  ११०० रू रोख आणि साडीची भेट  



चंद्रपूर  :  जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


                                              चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार

     चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. या कामाची नोंद आणि या कामातूनच आजच्या दिवसापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार मर्यादित राहिला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही बाधित मृत्युमुखी पडलेल्या नाही. आरोग्य यंत्रणेच्या यशामध्ये आशाताईंचे श्रम विसरता कामा नये ,असेही त्यांनी सांगितले.

       या महिन्यात रक्षाबंधनाचा भावा-बहिणीचा सण असून या पवित्र सणावर प्रत्येक आशा वर्करला सन्मानित करण्याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित केले असून ३ ऑगस्टला यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात येईल.

      यावेळी त्यांनी जिल्ह्यातून जवळपास ६५ हजार अन्य राज्यातील कामगार आपापल्या राज्यात गेले असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये अशावेळी कौशल्यपूर्ण कामगारांची गरज भासत आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. काही कामे कौशल्याची आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महिनाभराचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कामगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना, भरती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.आज यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सर्व खाणींच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती.

        आजच्या अन्य एका बैठकीमध्ये त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वन्यजीव व मानव संघर्षावर यामध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासा बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. वन मंत्र्यांसोबत या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

    भाताची रोवनी जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही. युरिया भेटत नसल्याबाबतच्या बातम्या या कृत्रिम टंचाईतून पुढे आल्या असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरियाची खेप पोहोचेल असे सांगितले.

English Translate :

Asha to honor worker on Rakshabandhan occasion:  Vijay Vadettiwar

  Ashatai has worked with great dedication in times of risk like Corona to reach out to the administration in villages and collect health information from the administration.
  On the occasion of Rakshabandhan, Asha worker will be honored with a gift of Rs. 1100 in cash and a sari

Chandrapur, July 28: I am proud to be a working brother of Asha Worker, who took care of the health of the citizens in Chandrapur district during the Corona infection. That is why the administration has decided to give . Vijay Vadettiwar has given.

     He gave this information while talking to reporters in the evening during his two-day visit to Chandrapur district. Ashatai has worked with great dedication in times of risk like Corona to reach out to the administration in villages and collect health information from the administration. The record of this work and from this work till today the spread of Corona disease in Chandrapur district has been limited. No casualties have been reported in the district so far. He also said that Ashatai's hard work should not be forgotten in the success of the health system.

       This month, Rakshabandhan is a festival of brothers and sisters. It has been decided as the Guardian Minister of the district to honor every Asha worker on this holy festival and a special program has been organized on 3rd August. Asha Workers from the district will be honored as representatives in these events.

      He clarified that about 65,000 workers from other states have gone to their respective states from the district. The industry in the district is in dire need of skilled workers. Apart from this, the mines of Western Coalfield Limited also require a large number of workers. Some work is skillful. He said that he has instructed to recruit local workers, educated unemployed, by imparting a month-long training in such places. For this, he had convened a meeting of the managers of all the mines of Western Coalfield Limited.

        In another meeting today, he held a meeting of forest department officials in the presence of former minister Shobhatai Fadnavis. It discussed wildlife and human conflict. The problems faced by the farmers were also discussed. Senior officials of the forest department were called for the meeting. He said another meeting with the forest minister would be held in this regard.

    He said that about fifty per cent of the paddy has been completed in Rowani district. Farmers will not be short of urea. News of the non-availability of urea has emerged from this artificial scarcity and is being investigated. He also said that a large consignment of urea would reach the district in the next two to three days.


          

No comments