Breaking News

२८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार

२८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार
मनपाचे आदेश जारी : नियमांचे पालन करणे आवश्यक





 सोशल मीडिया फेसबुक  वृत्तपत्राच्या माध्यमातून सलून दुकानदार तीन महिन्यापासून काम   बंद असल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर  उपासमारी वेळ आली हि बाब लक्षात घेता.   केशकर्तनालय अर्थात सलूनची दुकान मालकांना  राज्य शासनाच्या दिलेल्या  निर्देशनांनुसार  रविवार २८ जून पासून उघडण्यात येतील असे नागपुर मनपाने आदेश जरी केले. 

नागपूर, ता. २७ : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मागील तीन महिने बंद असलेले केशकर्तनालय अर्थात सलूनची दुकाने रविवार २८ जून पासून उघडण्यात येतील. परंतु दुकाने उघडल्यावर घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तेवढेच अत्यावशक आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेने शनिवारी (ता. २७) एक आदेश जारी करुन ही नियमावलीही नमूद केली आहे. 

या आदेशानुसार, सलून आणि ब्युटी पार्लर मर्यादित ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि तीसुद्धा पूर्वनिर्धारीत वेळ घेऊन उघडण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. हेअर कट, हेअर डाईंग, वॅक्सीन, थ्रेडिंग हे या दुकानांच्या माध्यमातून करता येईल. त्वचेशी निगडीत कुठलीही सेवा या दुकानातून देता येणार नाही. 


यासंदर्भात दुकानाच्या दर्शनी भागात ठळकपणे फलक लावणे आवश्यक राहील. सलून, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क, ॲप्रॉन, ग्लोव्ज् वापरणे बंधनकारक राहील. ज्या वस्तूंशी ग्राहकांचा संपर्क येईल उदा. खुर्ची, अशा सर्व वस्तू प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर निर्जंतुक करणे आवश्यक आहे. इतर सर्व जागा आणि जमिनीचा पृष्ठभाग प्रत्येक दोन तासानंतर निर्जंतुक करावा लागेल. 

ग्राहकांसाठी डिस्पोजल टॉवेल आणि नॅपकिनचा वापर करावा लागेल. ज्या वस्तू डिस्पोसेबल आहेत त्यांना प्रत्येक ग्राहकांना सेवा दिल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. ग्राहकांच्या माहितीसाठी सर्व सलूनमालकांनी दुकानाच्या दर्शनी भागात या सर्व बाबींची माहिती देणारा फलक लावणेही अत्यावश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
-------------------------------------
English  Translate :

The salon in Nagpur will open from June 8
Corporation orders issued: rules must be followed



 Considering the fact that the salon shopkeeper has been out of work for three months through the social media Facebook newspaper, his family is starving. The Nagpur Municipal Corporation has ordered that the hairdressing salons will be opened from Sunday 28th June as per the instructions given by the state government to the shop owners.

Nagpur, Tal. 27: As per the instructions given by the state government, the hairdressing salons which have been closed for the last three months will be reopened from Sunday 28th June. But it is equally important to follow the rules laid down when shops open. In this regard, Nagpur Municipal Corporation has issued an order on Saturday (27) and also mentioned these rules.

According to the order, salons and beauty parlors are being allowed to serve limited customers and also open on a pre-determined time. Haircuts, hair dyeing, vaccines, threading can be done through these shops. No skin related services can be offered through this shop.


In this regard, it will be necessary to put a prominent sign in the front area of ​​the shop. People working in salons and beauty parlors will be required to wear masks, aprons and gloves. Items that the customer will come in contact with e.g. Chairs, all such items must be disinfected after serving each customer. All other spaces and soil surfaces need to be disinfected every two hours.

Customers will have to use disposable towels and napkins. Items that are disposable will need to be disinfected after serving each customer. The order also said that it is essential for all salon owners to put up information boards in the front of the shop for the information of the customers.


No comments