Breaking News

नागपूर महानगर पालिका " मम्मी पापा यू टू "अभियान




नागपूर, ता. १५ :  पाचपावली येथील ब्लुस्टार कॉन्व्हेंट   मनपा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त
विद्यमानाने "मम्मी पापा यू टू अभियान" पालक सभेचे आयोजन करण्यात आले.

          यावेळी शाळेचे संचालक डॉ. धनराज भुते,  मुख्याध्यापिका डॉ. अनिता भुते , वाहतूक पोलीस  प्रशिक्षक श्यामराव ठोंबरे उपस्थित होते. 
या पालक सभेत, शाळा ही शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. त्या माध्यमातून पालक, बालकाच्या  स्वच्छता, आरोग्य, घर, शाळा, सभोतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाब  आणि स्वच्छताविषयक, वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी नागरीकांनी जबाबदारीने कार्य करून जास्तीत जास्त सहभागाव्दारे शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जागृतीचा संदेश पोहचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

            कार्यक्रमाचे  संचालन नीलिमा जांभुळकर व  आभार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  आयशा बानो, उषा जेम्स, संगीता लखपती, प्रमोद आंबादे आदी शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

1 comment:

  1. It's good stunt each and every school this program conduct

    ReplyDelete