Breaking News

ममी पाप यु टू' वादविवाद स्पर्धासह पथनाट्य

ब्लू स्टार कॉन्व्हेंटचे विद्यार्थी पथनाट्य सादर करतांना      

नागपूर, ता. २५ :  पाचपावली येथील सिंधी हिंदी स्कुल येथे  नागपूर महानगर पालिकेच्या  "ममी  पाप यु टू''  जनजागृती  अभियानात अंतर्गत वादविवाद स्पर्धासह  पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे निरीक्षक  संतोष नाकाडे, सिंधी हिंदीचे शिक्षक  अमोल  हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. ब्लू स्टार शाळेतील विदयार्थ्यांची पथनाट्य  स्पर्धेत  उत्कृष्ट  अभिनय व  वादविवाद स्पर्धेत सातव्या वर्गातील विनीत पाठ  आणि आदित्य अक्केवारची निवड झाल्याबद्दल  शाळेतील संचालक डॉ. धनराज भुते, मुख्याध्यापिका डॉ. अनिता भुते, शाळेतील शिक्षक आयशा बानो, उषा पाटील, वर्ष लोखंडे,  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



No comments