Breaking News

चित्रकला स्पर्धेत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश


नागपूर, ता.१२  महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होत असलेल्या "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा 2020'चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विशेष आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
यामुलांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कुपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी जाहिर करण्यात येत आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, इतर विद्यार्थ्यांसाठी "सकाळ' विशेष सवलत देली आहे. यापुर्वी दि. 3,5,7 रोजी सकाळच्या अंकात प्रसिद्ध झालेले व गुरुवारी (ता. 9) प्रसिद्ध होणारे विशेष कूपन भरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत सर्वसाधाराण विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी "आशिया बुक ऑफ रेकॉर्डस' आणि "इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस' या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची "सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा' अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे 34वे वर्ष आहे.
लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना "सकाळ' सातत्याने राबवीत आहे. "मुले हेच आपले भविष्य आहे' हा "सकाळ'च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने "सकाळ'च्या वतीने मुलांसाठी "सकाळ एनआयई' आणि "सकाळ यंगबझ' यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. "सकाळ चित्रकला स्पर्धा' हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद "सकाळ'तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धाकेंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.


चार गटांत स्पर्धा
-------------------
महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.
"गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी
"गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी
"गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी
"गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी
वेळ ः "अ' व "ब' गटांसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30
"क' व "ड' गटांसाठी सकाळी 9 ते 10.30
------------------------------

असे व्हा सहभागी
पर्याय 1 ः
- तुमचा गट निश्‍चित करा.
- "सकाळ'च्या ता. 3,5,7 रोजी सकाळच्या अंकात प्रसिद्ध झालेले व गुरुवार (ता. 9) या दिवशीच्या अंकामध्ये प्रसिद्ध होणारे "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा 2020'विषयीचे एक कूपन कापून ते पूर्ण भरावे.
- भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा
- आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा.
......

पर्याय-2
- विशेष कूपन भरू न शकल्यास http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. 10 प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा
- मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा.
 आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा.


1 comment: