संविधानाचे मुलभूत अधिकार आत्मसात करा : पराग पोटे
नागपूर,ता.२९ : "संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या अधिकाराचा कसा दुरुपयोग होतो व डिजिटल युगात कसा त्याचा गैरवापर कसा टाळता येईल दैनंदिन जीवनात संविधानाचे मुलभूत अधिकार आत्मसात करून त्याचे संगोपन करण्यावर भर नागरिकांनी द्यायला पाहिजे" असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी व्यक्त केले.
उत्तर नागपुरातील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था,सॉफ्ट पॉईंट कम्प्युटर संस्था, मिशन महा एमपीएससी , एचडीएफसी बँक, आयुष ब्लड बँक, डेंटल क्लिनिक व फास्टट्राक एकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाखांमध्ये संविधान दिनानिमित्त 'संविधान प्रास्ताविक वाचन' करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जरीपटका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे, सहा.पोलिस निरीक्षक सौ गिरी, उच्च न्यायालाचे वकील रेणुका दमाणी , रीन्केश साबळे , ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष राहुल वासनिक उपस्थित होते.
२४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान रक्तदान शिबीर, मोफत डेंटल चेकअप व "संविधान जागृती साठी भारतीय संविधान" या विषयावर आधारित ई टेस्ट चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप तथागत चौक येथील संस्थेच्या शाखेमध्ये झाला. याप्रसंगी विद्यार्थी सोबत परिसरातील नागरिकांनी संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सोहन दुबे यांनी केले. आभार बबीता फुले यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सचिन पाटील, प्रशांत कांबळे, संध्या नागदेवे, संकेत सावरकर, दिपाक्षी मरावी, अनुराग मेश्राम, मंगेश जुमनाके, हिमांशू तिरपुडे, केतन लंगडे उपस्थित होते.
No comments