Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही : प्रा. भाऊ लोखंडे

युथ फॉर रेवोल्युशनचा उपक्रम : #संविधान  जागर


नागपूर, ता. २८ : युवकांनी राजकारणाची गुरुकिल्ली आत्मसात करीत  शासन करते जमात व्हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदाता आहेत, मोक्षदाता  नाही. सर्व धर्माच्या लोकांना खरे स्वातंत्र २६ नोव्हेंबरला मिळाले  असे मत  प्रा.भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केले. ते युथ फ़ॉर रेवोल्युशनतर्फे ७० व्या संविधान दिनानिमित्त  नारा घाट रोड येथील मातेश्वरी भवनात  "संविधान नीतिमत्ता आणि लोकशाहीचे भवितव्य" या विषयावर परिसंवाद  आयोजित केलेल्या कार्यक्रमात  बोलत होते.

          कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे  आंबेडकरी साहित्यीक विचारवंत प्रा. भाऊ लोखंडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (युनो) कार्य समिती महाराष्ट्र प्रदेश चेरअमन आचार्य संदेश, इतिहास संशोधक अश्विर गजभिये,  माजी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विलास राऊत उपस्थित होते.

         भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात कलम क्र.१२ ते ३५ मध्ये नमूद केलेल्या सर्व भारतीयांच्या मूलभूत अधिकारांचा आढावा घेतला. हे अधिकार आणि त्यातून मिळालेले संरक्षण हे कोणत्याही विशिष्ट जाती अथवा समूहासाठी नसून ते धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, प्रांत विरहित भावनेने सर्व भारतीयांसाठी लागू झालेले अपूर्व अशा पध्दतीचे संरक्षण आहे, त्यामुळे ते समजून घेऊन नागरिकांनी त्यांचे  दररोज एक तास वाचन करीत प्राणपणाने जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत विलास राऊत यांनी व्यक्त केले.



        यावेळी गिट्टीखदान येथील मोरेश्वर धमगाये आणि म्युझिकल ग्रुपतर्फे  "भीमरायावणी पुढारी होईल का, भीमराय घे पुन्हा जन्म तू या दिना" असे भीमगीत आणि देशभक्ती गीत चंद्रपूर येथील संगीतकार देवदत्त सातपुते यांनी रसिक प्रेक्षकांसाठी गीत  सादर केले. गरजू मुलांना निःशुल्क स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या लिबर्टी  क्लासेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भीमा कोरेगाव, संत गाडगे महाराज अश्या विविध  महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे पोस्टर व सुविचारांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले.


    कार्यक्रमाचे संचालन पवन पाटील यांनी केले. आभार धम्मा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला युथ फॉर  रेवोल्युशनचे जितेंद्र गायकवाड, भूषण टेम्भेकर,  मच्छिन्द्र गायकवाड, गौतम आंबादे , सागर बागडे,दर्शना गायकवाड, अतुल रंगारी, अश्विन रंगारी, सचिन लांजेवार, सतीश मेश्राम, अंकिता बागडे, अमोल जनबंधु ,  उज्ज्वल मेश्राम, ओम कोटांगले,
कपिल नाइकआदी सदस्यांनी परीश्रम घेतले.

संविधानीक हक्कांचा नागरिकांमध्ये जनजागृती करतांना रथ (फोटो संकलित आहे)


1 comment: