संविधान दिवस मुक्तिदाता दिन : जोतीराव बारसागडे
![]() |
संविधान प्रास्थाविका वाचन करतांना शाळेचे संचालक जोतीराव बारसागडेसह शिकवृंद आणि विद्यार्थी. |
नागपूर, ता.३० : जरीपटका मिसाळले आउट येथील सेंट रोबेन पब्लीक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज आणि न्यु चैतन्य स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने 'संविधान दिनानिमित्त शाळेत संविधानाची प्रास्थाविकता वाचन करण्यात आले.
स्वतंत्र भारताची लोकशाही स्वातंत्र, समता ,बंधुत्व या तत्वा आधारीत आहे. २६ नोव्हेंबरला संविधानाचा जन्म झाला आणि आपण खऱ्या अर्थाने गुलामगिरीतुन मुक्त झाले म्हणून संविधान दिवस मुक्तिदाता दिन आहे,असे मत जोतिराव बारसागडे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान प्रास्थाविकाचे वाचन करीत नागरिकांना आपल्या अधिकारांच्या संवर्धन , जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने संविधान वाचन करावे असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक सचिन पाटील , शाळेचे संचालक जोतीराव बारसागडे, मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, शाळेची पर्यवेक्षिका आलीय अहमद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय मनवर यांनी केले. आभार गौरव सहारे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
No comments