Breaking News

"आसिफा हम शर्मीदा हे तेरे कातिल जिंदा हे"


बलात्कार्यांवर सौदी अरेबिया सारखी कठोर शिक्षा

✍...निलेश राऊत
नागपूर, ता.१९ असिफा व तिच्या सारख्या असंख्य निरपराध मुलींवर होणारे बलात्कार हे अतिशय निंदनीय व समाजाला काळीमा फसणारे आहेत.आपल्या देशात देखील बलात्कार्यांवर सौदी अरेबिया सरखी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे जेणेकरून हे असले अपराध करणारे नराधम असलंकाही कृत्य करण्याअगोदर १००० वेळा विचार करायला हवा..! "आसिफा हम शर्मीदा हे तेरे कातिल जिंदा हे" अमानविय घटनांचा निषेध व्यक्त करून दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टा चे माध्यमातुन खटला चालविण्याची मागणी विद्यार्थीनी केली. 
           असिफा वर झालेल्या अमानवीय बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ उत्तर नागपुरातील राममनोहर लोहिया वाचनालय,किसन गोंडाने वाचनालय, सिद्धार्थ वाचनालय, अमर जोती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हा कँन्डल मार्च शासनाच्या विरूध्द नारे निर्देशने करीत आवळे बाबू चौक, कमाल चौक, इंदोरा चौक, इंदोरा बोद्ध विहार, कामठी मार्गावर दहा नंबर पुलाजवळील नामांत्तर शहीद स्मारक येथे पोहोचला. सर्वांनी मोमबत्ती जाळून दोन मिनटे मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली अर्पण केला. यावेळी वाचनालयातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवतींचा मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments