डॉ. प्रवीण डबली यांना “जल योद्धा सन्मान” : N7 News Voice
डॉ. प्रवीण डबली यांना “जल योद्धा सन्मान”
जलसंवर्धन क्षेत्रातील कार्याचा राष्ट्रीय गौरव
![]() |
| डॉ. प्रवीण डबली यांना सन्मानित करताना श्री श्री रविशंकर गुरुजी. सोबत सरकारीटेलचे अमेय साठे आणि प्रसन्ना प्रभू. |
नागपूर : नागपूरचे प्रतिष्ठित नर्व स्टिम्युलेशन थेरपिस्ट, ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रवीण नीलकंठराव डबली यांना जलसंवर्धन आणि जलसुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यासाठी प्रतिष्ठित “जल योद्धा सन्मान” प्रदान करण्यात आला. हा सन्मान बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरच्या विशालाक्षी मंडपात आयोजित भव्य समारंभात पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते ट्रॉफी, शाल आणि प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या नीति आयोग, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भूमी संसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासन (सहभागी राज्य) यांच्या सहकार्याने, तसेच ज्ञान भागीदार ASSOCHAM, आयआयटी रुडकी आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन व राष्ट्रीय भागीदार इस्रायल आणि फिनलंड यांच्या सहकार्याने सरकारीटेल.कॉमतर्फे या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. प्रवीण नीलकंठराव डबली यांनी मिळवलेली ही कामगिरी केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
डॉ. प्रवीण डबली यांनी नर्व स्टिम्युलेशन थेरपी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक कुशल नर्व स्टिम्युलेशन थेरपिस्ट म्हणून ते कार्यरत असून ते एक जागरूक विचारवंतही आहेत, जे आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातील घनिष्ठ संबंध समजून घेतात. “निरोगी शरीर हे निरोगी पर्यावरणातूनच निर्माण होते,” या विचाराने प्रेरित होऊन ते समाजात जागरूकता निर्माण करण्याचे तसेच मृतप्राय ऐतिहासिक विहिरी पुन्हा जिवंत करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. नर्व स्टिम्युलेशन थेरपीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले असून त्यामुळे त्यांना व्यापक सामाजिक मान्यता मिळाली आहे.
या समारंभात देश-विदेशातून आलेल्या एकूण 36 जल योद्ध्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला संबोधित करताना श्री श्री रविशंकर यांनी सांगितले, “पाण्याविषयी निष्ठा हीच खरी सेवा आहे.” त्यांनी जलसंवर्धनाबाबत जनजागृती वाढवण्याची गरज अधोरेखित करत पर्यावरण संरक्षण, रसायनमुक्त शेती तसेच जल, वायू आणि भूमी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर दिला. त्यांनी जलसंवर्धन हे जनआंदोलन बनवण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा विवेकपूर्ण वापर करणे आणि कमी पाण्यात शेती करण्याच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रवीण डबली यांनी आपल्या मनोगतात शहरी भागात वाढत चाललेल्या जलटंचाईबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पारंपरिक जलस्रोत जसे ऐतिहासिक विहिरी, बावड्या आणि तलाव आज दुर्लक्षित होत आहेत, परंतु हेच जलसंवर्धनाचे भक्कम आधार आहेत. त्यांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आणि नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी वाचवण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. त्यांनी इशारा दिला की वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात जलसंकट अधिक गंभीर होऊ शकते.
डॉ. डबली यांनी असेही सांगितले की ज्या प्रकारे नर्व स्टिम्युलेशन थेरपी शरीराचा समतोल पुन्हा प्रस्थापित करते, त्याचप्रमाणे जलसंवर्धन पृथ्वीच्या नैसर्गिक संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांच्या या व्यापक दृष्टिकोनामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.
या कार्यक्रमात पद्मश्री उमाशंकर पांडे, पद्मश्री कंवल सिंह चौहान, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री सेठ पाल सिंह, पद्मश्री भारत भूषण त्यागी आणि पद्मश्री डिझिग्नेट मोहन नगर, श्री श्री रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट तसेच श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसन्ना प्रभू, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव (वॉटरशेड मॅनेजमेंट) नितीन खाडे, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे डॉ. हेमंत शरद पांडे, श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुमार वैश्या, माजी जलशक्ती मंत्रालयाचे संचालक गिरिराज गोयल, आयआयटी रुडकीचे प्राध्यापक डॉ. आशीष पांडे, व्हील्स ग्लोबल फाउंडेशनच्या इंडिया सीईओ सुजाता नरसिम्हन, वरिष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. ए.के. गुप्ता तसेच सरकारीटेलचे अमेय साठे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी जल व कृषी व्यवस्थापनाबाबत आपले विचार मांडले.
डॉ. प्रवीण डबली यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या समाजसेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी नागपुरात अनेक कोरड्या विहिरी पुन्हा जिवंत करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यास हातभार लावला आहे. तसेच नर्व स्टिम्युलेशन थेरपीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना नवजीवन देण्याचे कार्य केले आहे. हा सन्मान त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली दखल आहे.
Dr. Pravin Dabli, Expert in Nerve Stimulation Therapy, Receives "Jal Yoddha Samman"
National Recognition for Work in Water Conservation
Nagpur: Dr. Pravin Nilkanthrao Dabli—a distinguished Nerve Stimulation Therapist, veteran journalist, and environmental scholar from Nagpur—was conferred with the prestigious "Jal Yoddha Samman" (Water Warrior Honor) for his outstanding, consistent, and inspiring work in the fields of water conservation and water security. This honor was presented during a grand ceremony held at the Vishalakshi Mantap of the Art of Living International Center in Bengaluru, where he received a trophy, a traditional shawl, and a certificate at the hands of the revered Guruji, Sri Sri Ravi Shankar.
The ceremony was organized by GovernmentTail.com in collaboration with various government bodies—including NITI Aayog, the Department of Drinking Water and Sanitation, the Ministry of Jal Shakti, the Department of Land Resources, and the Ministry of Rural Development (Government of India)—as well as the Government of Maharashtra (as a participating state). Furthermore, the event was supported by knowledge partners such as ASSOCHAM, IIT Roorkee, and the WHEELS Global Foundation, along with international national partners, Israel and Finland. This achievement by Dr. Pravin Nilkanthrao Dabli at such a prestigious event has become a matter of great pride not only for Nagpur but for the entire Vidarbha region.
Dr. Pravin Dabli has carved a distinct niche for himself in the field of Nerve Stimulation Therapy. While serving as a skilled Nerve Stimulation Therapist, he is also a conscientious thinker who deeply understands the intrinsic connection between health and the environment. Inspired by the philosophy that "a healthy body is born only from a healthy environment," he has been consistently working to raise public awareness and to revive historical wells that had fallen into disuse. Through his work in Nerve Stimulation Therapy, he has brought about positive transformations in the lives of many, thereby earning widespread social recognition.
During this ceremony, a total of 36 "Water Warriors" from across the country and abroad were felicitated for their remarkable contributions. Addressing the gathering, Sri Sri Ravi Shankar stated, “Devotion to water is true service.” Emphasizing the need to raise public awareness regarding water conservation, he placed special stress on environmental protection, chemical-free farming, and the control of water, air, and soil pollution. He further asserted that transforming water conservation into a mass movement is an imperative. He noted that harvesting rainwater, utilizing water judiciously, and promoting technologies for low-water farming are the needs of the hour.
In his address, Dr. Pravin Dabli expressed concern over the escalating water scarcity in urban areas. He pointed out that traditional water sources—such as historic wells, stepwells, and lakes—are currently being neglected, despite serving as the robust foundations of water conservation. He emphasized that the protection and rejuvenation of these sources are absolutely essential and appealed to citizens to take an active role in conserving water within their own localities. He warned that failure to implement timely remedial measures could lead to a more severe water crisis in the future.
Dr. Dabli also drew an analogy, stating that just as nerve stimulation therapy restores the body's equilibrium, water conservation plays a pivotal role in maintaining the Earth's natural balance. This comprehensive perspective has earned him a distinct identity.
The event was attended by Padma Shri Umashankar Pandey, Padma Shri Kanwal Singh Chauhan, Padma Shri Popatrao Pawar, Padma Shri Seth Pal Singh, Padma Shri Bharat Bhushan Tyagi, and Padma Shri-designate Mohan Nagar; Prasanna Prabhu, President of the Sri Sri Rural Development Program Trust and the Sri Sri Institute of Agricultural Sciences and Technology Trust; Nitin Khade, Joint Secretary (Watershed Management) at the Ministry of Rural Development, Government of India; Income Tax Commissioner Dr. Nitin Waghmode; and Dr. [Name] from Western Coalfields Limited. Prominent attendees at the event included Hemant Sharad Pandey; Sachin Kumar Vaishya, Chief Executive Officer of the Shri Mata Vaishno Devi Shrine Board; Giriraj Goyal, former Director at the Ministry of Jal Shakti; Dr. Ashish Pandey, Professor at IIT Roorkee; Sujata Narasimhan, India CEO of the WHEELS Global Foundation; senior homeopathic expert Dr. A.K. Gupta; and Ameya Sathe of SarkariTel. During the program, experts and officials shared their insights regarding water and agricultural management.
The honor bestowed upon Dr. Pravin Dabli stands as a symbol of his social service and dedication. He has made a significant contribution to enhancing water availability in Nagpur by revitalizing numerous dried-up wells. Furthermore, through Nerve Stimulation Therapy, he has played a pivotal role in giving a new lease on life to many individuals. This accolade serves as a national-level recognition of his multifaceted personality and his unwavering commitment to society.

No comments