Breaking News

होळीचा हंगा अन धम्माचा रंगा: आपण काय करायले पाहिजे? :N7 News Voice

 

होळीचा हंगा अन धम्माचा रंगा: आपण काय करायले पाहिजे?

www.n7news voice
फोटो : एआय 
जय भीम मंडळी ! आता पहा ना, होळी-धुलिवंदन आलं का गल्लीबोळात पार आरडाओरडा, डीजेचा धिंगाणा अन रंगाचा राडा सुरू होऊन जाते. कुणी लाकडं गोळा करते, तर कुणी पाण्याचे फुगे मारते. दुनिया या बाह्य रंगात पार डुबून जाते. पण आपण कोण आहो? आपण आहो तथागत बुद्धाचे उपासक! मग अशा टायमले आपलं काय कर्तव्य हाये? हेच सांगायले हा लेख लिहून राहिलो.

बुद्ध म्हणते, "मनावर विजय मिळवणाराच खरा विजेता हाये." आता पहा, बाहेर जेव्हा होळी पेटते, तेव्हा लोकं लाकडं जाळते. पण आपण एक धम्म उपासक म्हणून आपल्या मनातलं वैर, द्वेष, लोभ अन अज्ञान या ध्यानाच्या अग्नीत जाळून खाक करायला पाहिजे ना! होळीचा सण कोनाचा भी असो, आपल्याला या सुट्टीच्या टायमाचा उपयोग स्वतःले सुधारण्यावर करायला पाहिजे.

बाहेर जगात जेव्हा हुल्लडबाजी चालू असते, तेव्हा बुद्ध उपासकानं शांत राहून 'ध्यान' करणं लय गरजेचं हाये. काऊन? कारण सणाच्या नावाखाली लोकं आजकाल काय करून राहिले? दारू पिऊन नाल्यात पडून राहते, कुणावर भी जबरदस्ती रंग टाकते, शिवीगाळ करते. हे सगळं काय हाये? हे 'अकुशल कर्म' हाये. पण आपण धम्माचे पाईक आहो. आपल्याला 'पंचशील' पाळायचं हाये. ध्यानात बसलं ना, तर आपलं मन विचलित होत नाही. बाहेर किती भी डीजे वाजो, आपल्या मनातली शांती ढळायला नको.

पहा बाप्पा, सण येते अन् जाते, पण आपण काय कमावलं? होळीच्या दिवशी जर तुम्ही अर्धा-एक तास शांत चित्तानं 'आनापान' केलं किंवा 'विपश्यना' केली, तर तुम्हाला समजून येईल की बाहेरच्या रंगापेक्षा आपल्या आतला शांतीचा रंग किती भारी हाये. रंगाचा काय हाये, आज लावला तर उद्या धुतल्यावर निघून जाईल, पण ध्यानाचा जो रंग चढते ना, तो जिंदगीभर उतरत नाही!

दुसरी गोष्ट म्हणजे 'मैत्री भावना'. होळीच्या दिवशी लोकं एकमेकावर रंग टाकून भांडणं उकरून काढते, पण आपण ध्यानाच्या माध्यमातून सर्वांवर 'मैत्रीचे' विचार टाकायला पाहिजे. "सब्बे सत्ता सुखी होन्तु" (सर्व प्राणी सुखी होवोत) - हा विचार मनात ठेवून जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण धम्म जगतो.

म्हणून माझ्या नागपूरच्या भावांनो अन् बहिणींनो, या होळीले विनाकारण बाहेर भटकण्यापेक्षा, घरी बसून थोडा वेळ धम्माचा अभ्यास करा. बुद्धाच्या मूर्तीसमोर मेणबत्ती लावा, अगरबत्ती पेटवा अन् शांत डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. जो कचरा डोक्यात भरलेला हाये, तो काढून फेका.

लक्षात ठेवा, तथागतांचा मार्ग हा प्रज्ञेचा मार्ग हाये. बाहेरचा पसारा आपल्याला काही देणार नाही, पण ध्यानातून मिळणारी शांती तुमची जिंदगी बदलून टाकेल. मग ठरवा मग, या होळीले बाहेर गुलाल उधळायचा की आपल्या अंतर्मनात धम्माची ज्योत पेटवायची?

नमो बुद्धाय! धम्म पालन करा, सुखी राहा!

-कोमल राऊत, सह-संपादक

एन७ न्यूज व्हॉइस, नागपूर 

मो. ७२१८११६०१४

Holi and Dhamma: What should we do? 


Jai Bhim Mandali! Now look, Holi-Dullivandan has arrived, the streets are filled with shouting, DJs' blare and a riot of colors. Some collect wood, while others blow water balloons. The world is immersed in this external color. But who are we? We are the worshippers of the Tathagata Buddha! So what is our duty at such times? I have written this article to tell you this. Buddha says, "The true winner is the one who conquers the mind." Now look, when Holi is burning outside, people burn wood. But as a worshipper of the Dhamma, we should burn the enmity, hatred, greed and ignorance in our minds in the fire of meditation! No matter what the Holi festival is, we should use this holiday time to improve ourselves. When there is a commotion in the world outside, it is essential for Buddhists to remain calm and do 'meditation'. Why? Because what have people done in the name of the festival these days? They drink alcohol and lie in drains, forcefully paint anyone, and abuse them. What is all this? This is 'unskillful karma'. But we are followers of Dhamma. We have to follow the 'Panchsheel'. If we sit in meditation, our mind does not get distracted. No matter how much DJ plays outside, our peace of mind should not be disturbed. Look, Bappa, festivals come and go, but what have we earned? On the day of Holi, if you do 'Anapana' or 'Vipassana' with a calm mind for half an hour, you will understand how much more powerful the color of peace inside us is than the color outside. What about color, if you apply it today, it will be gone tomorrow after washing it, but the color that is applied through meditation does not fade away for a lifetime! Another thing is the 'feeling of friendship'. On the day of Holi, people throw colors on each other and start fights, but we should spread the thoughts of 'friendship' towards everyone through meditation. "Sabbe satta sukhi hontu" (May all beings be happy) - when we meditate with this thought in mind, we truly live the Dhamma. Therefore, my brothers and sisters of Nagpur, instead of wandering outside unnecessarily on this Holi, sit at home and practice the Dhamma for a while. Light a candle in front of the Buddha's idol, light an incense stick and quietly close your eyes and focus on your breathing. Remove the garbage that is filled in your head. Remember, the path of the Tathagata is the path of wisdom. The external environment will not give you anything, but the peace you get from meditation will change your life. So decide, should you throw flowers outside this Holi or light the flame of Dhamma within yourself?
 
Namo Buddha! Follow the Dhamma, stay happy!

-Komal Raut, Co-Editor
N7 News Voice,
Nagpur (M. 7218116014)





No comments