Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रिपब्लिकन पक्ष वाढवणे ही काळाची गरज : N7 News Voice

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  रिपब्लिकन पक्ष वाढवणे ही काळाची गरज  

Nagpur

नागपूर,ता.१  : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर शहराच्या वतीने आयोजित रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा उत्तर नागपूरातील एच के जी एन बँक्वेट हॉलपाटणकर चौकयेथे उत्साहात संपन्न झाला.

मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल रायपुरे यांनी केलेतर अध्यक्षस्थानी नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे होते. विचारमंचावर ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच माजी नगरसेवक जनार्दन मूनडी. एम. बेलेकरईश्वरजी मेश्रामजयंत टेंभुरकरधीरज देशभ्रतार आणि डॉ. निलेश देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर शहर अध्यक्ष क्षितिज गायकवाड यांनी केले.

मेळाव्यात बाबासाहेबांच्या मूळ राजकीय विचारांचा खरा वारसा हा फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडेच असल्याचा ठाम सूर सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. पक्ष अधिक बळकट करण्यासाठी संघटनात्मक बांधणीकार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि तळागाळात विचार पोहोचविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

रमेश जीवने यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ पक्षाची वाढ ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “जोपर्यंत रिपब्लिकन पक्ष जिवंत राहीलतोपर्यंत बाबासाहेबांचे नाव आणि त्यांचे राजकीय विचार जिवंत राहतील,” असे ते म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही केवळ राजकीय चळवळ नसून एक व्यापक विचारधारा असून ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्घाटक गोपाल रायपुरे यांनी आपल्या भाषणात रिपब्लिकन पक्ष ही आत्मसन्मानाची लढाई असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर शहर महासचिव रजत महेशगवली यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेश खोबरगडेमनोज वासनिकअश्वजीत गायकवाडराहुल मेश्रामवृषभ राऊतसौरभ वाघमारेज्ञानदीप कुमारशुभम वनकरशुभम जांभुळकरनिखिल गायकवाड आणि मेघा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  

 Dr. Babasaheb Ambedkar's Republican Party is the need of the hour

 Nagpur, Date 3: The Republican Party of India Nagpur city organized a Republican worker meeting at HKGN Banquet Hall, Patankar Chowk, North Nagpur.

 The meeting was inaugurated by Maharashtra State Secretary Gopal Raipure, while Nagpur State President Prakashji Kumbhe was the chairman. Senior Republican thinker Ramesh Jeevane guided the attendees as the main guide on the discussion forum. Also, former corporator Janardan Moon, D. M. Belekar, Ishwarji Meshram, Jayant Tembhurkar, Dheeraj Deshbhratar and Dr. Nilesh Deshpande expressed their views. Nagpur City President Kshitij Gaikwad introduced the program.

 At the meeting, all the dignitaries expressed their firm belief that the true legacy of Babasaheb's original political thoughts lies only with the Republican Party of India. The opinion was expressed that organizational building, training of workers and reaching the grassroots are needed to strengthen the party.

Ramesh Jeevan, while giving guidance, said that the growth of Dr. Babasaheb Ambedkar's original party is the need of the hour. "As long as the Republican Party remains alive, the name of Babasaheb and his political thoughts will remain alive," he said. He mentioned that the Republican Party of India is not just a political movement but a broad ideology and it is necessary to reach every citizen.

 Inaugural speaker Gopal Raipure asserted in his speech that the Republican Party is a battle for self-respect.

 The program was coordinated by Nagpur City General Secretary Rajat Maheshgavli. Suresh Khobargade, Manoj Wasnik, Ashwajit Gaikwad, Rahul Meshram, Vrishabh Raut, Saurabh Waghmare, Gyandeep Kumar, Shubham Vankar, Shubham Jambhulkar, Nikhil Gaikwad and Megha Waghmare worked hard to make the gathering a success. A large number of activists were present at the gathering. 

 


No comments