हंसकृपा शाळेत
राज्यसभा खासदार नबाम रेबिया यांची सदिच्छा भेट;
भारतीय संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद मेळावा संपन्न
नागपूर,ता.३ : कोरडी रोड येथील हंसकृपा इंग्लिश प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये सोमवारी अरुणाचल प्रदेशचे माजी सभापती आणि माजी मंत्री, वर्तमान राज्यसभा खासदार मा. नबाम रेबिया यांनी सदिच्छा भेट दिली. ग्रामीण महिला मागासवर्गीय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी त्यांनी हा दौरा केला.
या मंगलमयी प्रसंगी शाळेत एका विशेष 'आनंद मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मा. नबाम रेबिया यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून भारतीय खाद्यसंस्कृती आणि त्यातील वैविध्याबाबत सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक दुर्गादास जिचकार, प्राचार्य रूपाली जवंजाळ आणि उपप्राचार्य प्रिती चौरसिया यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, बुके देऊन आणि कपाळाला गुलालाचा टिळा लावून भारतीय परंपरेनुसार स्वागत केले. याप्रसंगी हिंदी साहित्य अकादमीचे माजी संचालक श्री. जगदीश थपलियार, अमित ओझा, श्री. रंजनदास (OSD), सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पातोडे यांच्यासह शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सारिका चोपडे मॅडम यांनी केले.
Rajya Sabha MP Nabam Rebia pays a goodwill visit to Hanskrupa School;
Anand Mela of Indian Culture and Food Culture concluded
Nagpur,3: Former Speaker and former Minister of Arunachal Pradesh, current Rajya Sabha MP Hon. Nabam Rebia paid a goodwill visit to Hanskrupa English Primary and Secondary School on Kordi Road on Monday He made this visit to inspect the various activities being carried out under the Rural Women Backward Classes Education Institute. On this auspicious occasion, a special 'Anand Mela' was organized in the school. Stalls of various food items showcasing Indian culture were set up through this mela. Hon. Nabam Rebia directly interacted with the students and discussed in detail about Indian food culture and its diversity. At the beginning of the program, the Director of the Institute Hon. Shri. Durgadas Jichkar, Principal Rupali Jawanjal and Vice Principal Priti Chaurasia welcomed the dignitaries by giving them shawls, shriphals, bouquets and applying rose petals on their foreheads as per Indian tradition. On this occasion, former Director of Hindi Sahitya Akademi Mr. Jagdish Thapliyar, Amit Ojha, Mr. Ranjan Das (OSD), social activist Swapnil Patode along with all the staff and students of the school were present in large numbers. Sarika Chopde Madam proposed the vote of thanks for the program.
No comments