झिंगाबाई टाकळी : केबलसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण कोसळला : N7 News Voice
झिंगाबाई टाकळी : केबलसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण कोसळला; अंधारामुळे मोठा अपघात, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
नागपूर,ता.७ : शहरातील झिंगाबाई टाकली परिसरात प्रशासकीय हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झिंगाबाई टाकळी ते गोंधणी मार्गावर केबल आणि सीसी टीव्हीसाठी खोदलेले खड्डे उघडेच ठेवल्याने, रात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती आपल्या दुचाकीसह थेट खड्ड्यात कोसळला. सुदैवाने, आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, झिंगाबाई टाकली ते गोंधणी या परिसरात गेल्या काही दिवसांपासून केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा अर्धवट असताना हे खड्डे योग्य रित्या बुजवण्यात आले नाहीत. शुक्रवारी रात्री एक दुचाकीस्वार या मार्गावरून जात असताना त्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि तो गाडीसह आत कोसळला.
स्ट्रीट लाईट असूनही अंधार
स्थानिक रहिवासी दिनेश होले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात स्ट्रीट लाईटचे खांब तर उभे करण्यात आले आहेत, परंतु अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूंनी प्रचंड अंधार असतो. "रस्त्यावर खड्डे आहेत हे दिसत नाही आणि लाईटही नसल्यामुळे हा अपघात झाला आहे," असे होले यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांची घटनास्थळी भेट
अपघाताची माहिती मिळताच गोंधणीचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अरुण राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने लोकांच्या जीवाशी खेळू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांमध्ये संताप
या अपघातामुळे झिंगाबाई टाकली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उघड्या खड्ड्यांमुळे आणि बंद पथदिव्यांमुळे आणखी किती जणांचे बळी घेणार? असा सवाल स्थानिक विचारत आहेत. संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित बुजवून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
आमच्या www.n7newsvoice.in वेब पोर्टलवर अशाच ताज्या बातम्यांसाठी जोडलेले राहा.
Zingabai Takli: Young man falls into a pit dug for cable laying; major accident averted due to darkness, timely intervention by local residents saves his life
Nagpur, 7: Another shocking incident of administrative negligence has come to light in the Zingabai Takli area of the city. Due to the open pits dug for laying cables and CCTV lines on the Zingabai Takli to Gondhani road, an unknown person fell into a pit along with his two-wheeler at night. Fortunately, the young man's life was saved due to the immediate intervention of nearby residents. What exactly happened? According to the information received, pits have been dug at various places in the Zingabai Takli to Gondhani area for laying cables for the past few days. However, these pits were not properly filled after the work was completed or while it was still in progress. On Friday night, a motorcyclist was traveling on this road when he failed to notice the pit and fell into it along with his vehicle. Darkness despite streetlights: According to local resident Dinesh Hole, street light poles have been erected in the area, but they have not yet been switched on. It is extremely dark on both sides of the road at night. "The accident happened because the pits on the road are not visible and there are no lights," Hole said. Political leaders visit the accident site: Upon receiving information about the accident, Arun Raut, Vice President of the Congress party in Gondhani, immediately rushed to the spot and inspected the area. The sentiment was expressed that the administration and the concerned contractor should not play with people's lives. Anger among citizens: This accident has caused intense anger among the residents of the Zingabai Takli area. Locals are asking how many more lives will be lost due to the open pits and non-functional streetlights? There is a growing demand that the concerned department should immediately fill these potholes and switch on the streetlights.
Stay connected to our web portal www.n7newsvoice.in for more such latest news.



No comments