Breaking News

स्व. रंजीता टेम्भूरकर यांच्या स्मृतीला आगळेवेगळे अभिवादन : n7 Newsvoice


माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे स्मरण केवळ विधीपुरते मर्यादित न ठेवता, समाजातील गरजू घटकांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम उत्तर नागपुरात राबविण्यात आला.

मूकबधिर विद्यार्थ्यांना 'एक वही, एक पेन' चे वाटप

नागपूर,ता.२१ : माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे स्मरण केवळ विधीपुरते मर्यादित न ठेवता, समाजातील गरजू घटकांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम उत्तर नागपुरात राबविण्यात आला. नारी रोड, मयूरनगर येथील श्री किसन मूकबधिर निवासी विद्यालयात स्व. रंजीता मनोज टेम्भूरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

या स्मृती प्रित्यर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना 'एक वही आणि एक पेन' देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात युथ फॉर रिवोल्युशनचे जितेंद्र गायकवाड, सतीश मेश्राम आणि पत्रकार निलेश राऊत यांची प्रामुख्याने उपस्थित होते.  मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. रंजीता टेम्भूरकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम महेशकर यांनी टेम्भूरकर परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शिक्षक पंकज वानखेडे, विशेष शिक्षिका प्रतिभा उंदीरवाडे, लीना वानखेडे आणि तृप्ती रामटेके यांची उपस्थिती होती. मूकबधिर विद्यार्थ्यांनीही या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला. या उपक्रमासाठी पवन पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर केवळ विधींवर खर्च न करता, एका सामान्य कुटुंबाने समाजातील गरजू आणि विशेष मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातून पवन पाटील आणि टेम्भूरकर परिवाराचे मोठे कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या उपक्रमातून समाजातील इतर दात्यांनीही प्रेरणा घेऊन विशेष मुलांच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

---------


A unique tribute to the memory of the late RanjitaTembhurkar; 'One-Notebook,One Pen'distributed to deaf and mute students
Nagpur, २१ : In North Nagpur, a commendable initiative was undertaken to honor the memory of a deceased person not merely through rituals, but by upholding social responsibility through helping the needy sections of society. At the Shri Kisan School for the Deaf and Mute in Mayur Nagar, Nari Road, educational materials were distributed to the students on the death anniversary of the late Ranjita Manoj Tembhurkar, paying a unique tribute to her memory. In her memory, the students of the school were given 'one notebook and one pen' to support their educational journey. Jitendra Gaikwad and Satish Meshram of Youth for Revolution, and journalist Nilesh Raut were prominently present at the program organized on this occasion. In their speeches, the dignitaries recalled the memories of the late Ranjita Tembhurkar and expressed the opinion that such social initiatives instill a love for education in the students. The school's headmaster, Ghanshyam Maheshkar, praised this initiative of the Tembhurkar family. Teachers Pankaj Wankhede, special education teachers Pratibha Undirwade, Leena Wankhede, and Trupti Ramteke were also present. The deaf and mute students also expressed their happiness about this assistance. Pawan Patil took special initiative for this program. Instead of spending only on rituals after the death of a loved one, a common family extended a helping hand for the education of needy and special children in society. Pawan Patil and the Tembhurkar family are being widely praised in the area for this decision. The school staff cooperated for the success of the program. A message was given that other donors in society should also take inspiration from this initiative and come forward to help special children.

No comments